चांदुर बाजार तालुक्यातील अवैध गौण खनिज तस्करी करणाऱ्या महसूल विभाग कडून मूक संमती,मुरूम चोरी करणाऱ्या वाहनावर अद्यापही कार्यवाही नाही.

Google search engine
Google search engine

चांदुर बाजार तालुक्यातील अवैध गौण खनिज तस्करी करणाऱ्या महसूल विभाग कडून मूक संमती,
मुरूम चोरी करणाऱ्या वाहनावर अद्यापही कार्यवाही नाही.

चांदुर बाजार

सध्या उन्हाळ्या मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असून या बांधकाम ला लागणाऱ्या काळ्या रेतीचा तसेच भर्ती साठी मुरूम ची आवश्यकता असल्याने मोठ्या प्रमाणावर याची मागणी वाढली आहे.तर सध्या चांदुर बाजार तालुक्यातील दोनच वाळूघाटाचा लिलाव झाल्या असल्याने मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गानी वाळू तस्करी तर होतच आहे त्याच बरोबर मुरूम ची सुद्धा मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.मात्र या सर्व कडे महसूल विभागाने दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतल्यामुळे वाळू तस्करी तसेच मुरूम तस्करी करणारे याना सुगीचे दिवस आले आहे.

तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी अनेक कार्यवाही करून वाळू ची वाहतूक करणारे ट्रक्टर कार्यलय मध्ये लावले होते मात्र महसूल विभागाच्या निर्णय मुळे जवळपास सर्वच ट्रॅक्टर सोडण्यात आले.त्य वाळू तस्करी करणारे अचलपूर उपविभागीय अधिकारी यांच्या कडे वाहन सोडण्या बाबत  स्वीपृत नामा सादर करून आणि 124000 दंड च्या चौथा भाग रक्कम भरून सोडले गेले तर मुरूम ची वाहतूक करणारे यांनी जवळपास तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील नव्याने बांधण्यात आलेले रस्ते  तर घराब केलेच मात्र आपल्या वाहनात एकच ब्रास मुरूम बसल्या चे सांगून परवाना मिळून दोन ते तीन ब्रास वाहनातून वाहतूक सुरू ठेवली आहे.आता महसुल बुडविला जात नाही का अशा प्रश्न आहे.

तर अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी तसेच अमरावती जिल्हाधिकारी यावर कधी कार्यवाही करतील अशा प्रश्न देखील आहे.वाहयावरील ऑनलाइन जीपीएस प्रणालीद्वारे अवैध वाहतूक होत असल्याची माहिती असताना देखील कार्यवाही चांदुर बाजार महसूल विभाग मार्फत होत नाही आहे.त्यामुळे आता सध्या तर चांदुर बाजार तालुक्यात महसुल विभाग मध्ये कुपनच शेत गिळत असल्याचे चित्र दिसत आहे.त्यामुळे महसूल गोळा कसा होणार हा देखील प्रश्न जिल्हाप्रशासन बरोबर स्थानिक तहसिल कार्यलाय वर आहे.तर महसूल विभाग पंधरवड्यात एक दोन कार्यवाही मध्ये समाधानी आहे.त्यामुळे कार्यवाही चा वेग कधी वाढणार हा देखील प्रश्न आहे.