ऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ ? #Roohafza

1511

चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान)

उन्हाळ्याचे दिवस सुर्य आग ओकत असतांना उन्हाळ्यात रूह अफजा नावाचे सरबत पिण्याकडे अनेकांचा कल असतो. खासकरून रमजानच्या महिन्यात तर मुस्लिम बांधव दिवसभर रोजा पकडतात तर सांयकाळी इफ्तारसाठी रूह अफजा असतोच. अशातच गेल्या काही दिवसांपासून रूह अफजा हा सरबताचा प्रकार बाजारात मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे याबाबत सोशल मीडियावर देखील चर्चा रंगली आहे. रूह अफजाची मागणी केली जात आहे.

रूह अफजा चे उत्पादन करणाऱ्या हमदर्द चे संस्थापक हकीम हाफिज अब्दुल मजीद यांचे नातू अब्दुल मजीद आणि त्यांचा चुलत भाऊ हामिद अहमद यांच्यातील अंतर्गत वादाचा परिणाम रूह अफजाच्या उत्पादनावर झाल्याचे बॊलले जात आहे.

काय आहे कंपनीचा दावा

रूह अफजा या कंपनीने मात्र या सर्व चर्चाना फाटा दिला आहे. हमदर्द चे मार्केटिंग अधिकारी मंसूर अली यांनी संगितले आहे की, “आम्ही काही हर्बल वस्तूंच्या पुरवठ्याच्या कामरतेला सध्या तोंड देत आहोत. आम्हाला आशा आहे की पुरवठा मागणीतील फरक एका आठवड्यात घटला जाईल. “अली यांनी सांगितले की या 400 दशलक्ष ब्रँडची विक्री उन्हाळ्यात 25 टक्क्यांनी वाढली आहे. पुढे बोलताना अली म्हणाले,” विभाजन बद्दल चर्चा पूर्णपणे निराधार आहे, हे सर्व अफवा आहे असे मंसूर अली यांनी सांगितले.

यावेळी पुढे बोलताना अली म्हणाले “आम्ही कच्च्या मालाचा स्टॉक नेहमी ठेवतो. पण या वेळेला कच्च्या मालाची कमतरता आहे. ज्या आयुर्वेदिक कच्च्या मालातुन आम्ही उत्पादन बनवतो ते यंदा नेहमीप्रमाणे उपलब्ध झाले नाही. जे लोक आधीच कॅश देत आहेत त्यांना आम्ही आधी पुरवठा करीत आहोत. सध्या हा ब्रँड 4.5 लाख रिटेलर्स पर्यंत पोहचतो आहे.

सोशल मीडियावर #Roohafza क्रेज


एका वापरकर्त्याने ट्विट केले आहे की ” आम्हीच अनेक वर्षांपासून रूह अफजा वापरत आहोत. आज प्रत्येकजण #Roohafza मिस करीत आहे.

कौटुंबिक वादामुळे बंद झाले होते उत्पादन ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहमद यांनी मजीद यांच्या विरोधात एक केस फाईल केली होती. त्यामुळेच रूह अफजा चे उत्पादन बंद करण्यात आले होते. रुह अफझाने सुमारे 1000 कोटी रुपयांच्या सिरप ड्रिंकच्या बाजारपेठांवर कब्जा केला आहे.

जाहिरात