आकोटच्या पुरातन श्री नरसिंह मंदीरात श्रींच्या जन्मोत्सवाचे आयोजन

362

जन्मोत्सवा निमित्य विविध धार्मिक कार्यक्रम

अकोट,ता.प्रतिनीधी

दरवर्षी प्रमाणे यंदाही अकोटच्या पुरातन श्री.नरसिंह मंदीरात भगवान नरसिंह जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.आकोट शहरातील हे मंदीर विदर्भातील श्री नरसिंहाच्या पुरातन मंदीरापैकी एक असुन भाविकांच्या मनोकामना पुर्ण करणारे आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे.

जन्मोत्सवानिमित्य वैशाख शुध्द षष्ठी,दि.१० मे रोजी नवरात्र स्थापना करण्यात येणार आहे.वैशाख शुध्द चतुर्दशी शुक्रवार,दि.१७ में रोजी श्री.नरसिंह जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मालेगाव(वाशिम) येथील स्वाती दिपक आसरकर यांचे हरिकिर्तन जन्मोत्सवाचे निमित्ताने शुक्रवार,दि.१७ मे रोजी होणार आहे.श्री.नरसिंह जन्मोत्सवाचे निमित्ताने मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या आयोजनाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदीराचे विश्वस्त दीपक देव,अनिल देव व श्रीश देव यांनी केले आहे.

जाहिरात