१४ मे ला पदविधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणीक उपोषण – आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आयोजन

0
650
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान ) 
आपल्या विविध मागण्यांसाठी पदविधर अंशकालीन कर्मचारी येत्या १४ मे ला संभाजी महाराज जयंतीदिनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व रक्तदान शिबीराचे आयोजन प्रहारचे संस्थापक तथा आमदार बच्चु उर्फ ओमप्रकाश कडु यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय ९ मे ला अमरावती येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
     ९ मे रोजी अमरावती येथील शासकीय विश्राम गृह येथे आमदार बच्चु कडु यांच्या अध्यक्षतेखाली पदविधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्य शासनाच्या प्रशासकीय यंत्रनेद्वारे २ मार्च २०१९ च्या पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना शासन सेवेत कत्रांटी तत्वावर नियुक्ती करण्याचे कौशल्य विकास व उद्दोजकता, रोजगार विभागाचे सहाय्यक सचिव एस.बि.मांडवे यांनी शासन परिपत्रक काढून २ महीण्याचा कालावधी पुर्ण झाला असतांना सुध्दा शासनाने अजून पर्यत शासन परिपत्रकाची अंमलबजावनी केली नाही. त्यामुळे आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वात १४ मे रोजी संभाजी महाराज जयंती दिनाचे औचुत्य साधून विभागीय आयुक्त कार्यालय समोर रक्तदान शिबीर व एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. असे या बैठकीत सर्वानुमते ठरले आहे. करिता अमरावती जिल्ह्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांनी या आंदोलनात उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल वरघट व इतरांनी केले आहे.