तेर येथे ११ जणाविरुध्द विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल

411

तेर येथे ११ जणाविरुध्द विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल

उस्मानाबाद /प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ११ जणांविरुद्द ढोकी पोलीस ठाण्यात विनयंगाचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.हि घटना ता १२/५/२०१९ (रविवारी) तेर येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की तेर येथे फिर्यादीच्या घरासमोर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नालीच्या पाण्याच्या कारणावरुन किरकोळ शाब्दिक झाली होती.परत साडेदहा वाजता याच भांडणाचे रूपांतर विनयभंगात झाले.या घटनेच्या दोन फिर्यादी दिल्यावरुन एकूण ११ जणाविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सुरवातीला दिलेल्या तक्रारीत १)बालाजी भारतसींह राजपूत २) नंदकिशोर बालाजी राजपूत ३) सुप्रिया नंदकिशोर राजपूत ४) दिग्विजय बालाजी राजपूत ५) अनिता बालाजी राजपूत ६) जमीर मैनोद्दीन शेख सर्व राहणार तेर यांच्याविरुद्ध तर दुसर्या फिर्यादिवरून १) शरण विजयसिंह राजपूत २) रोहन सुरेंद्रसिंह राजपूत ३) रोहित सुरेंद्रसिंह राजपूत ४) विजयसिंह हनुमानसिंह राजपूत ५) सुरेंद्रसिंह राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यात दोन्ही फिर्यादित गुन्हा कलम एकच आहे. यात कलम ३५४ (ब) ,३२४,३२३,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६ याप्रमाणे दाखल करण्यात आले आहेत .यातील एका घटनेचा तपास हे ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत पाटिल तर दुसर्या घटनेचा तपास पोलीस उप निरिक्षक शिंदे हे करत आहेत.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।