रेशन दुकानदारांची मनमानी, लाभार्थ्यांची झोळी रिकामी,पुरवठा निरीक्षक पद अनेक महिण्यापासून रिक्त,अतिरिक्त चार्ज वर कसा चालणार कार्यभार

Google search engine
Google search engine

 

रेशन दुकानदारांची मनमानी, लाभार्थ्यांची झोळी रिकामी,

पुरवठा निरीक्षक पद अनेक महिण्यापासून रिक्त,अतिरिक्त चार्ज वर कसा चालणार कार्यभार
चांदुर बाजार:-
चांदुर बाजार तहसील कार्यलय अंतर्गत एकूण जवळपास 141 राशन दुकान आहे.यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी नियमित धान्य साठा होतो.किंवा राशन दुकानदार ते करून घेतात आणि मात्र काही ठिकाणी राशन दुकानदार हे आपल्या मनमानी पण मुळे ओळखले जात आहे.लाभार्थी याच्या योग्य न्याय मिळत नसल्याने त्यांनी आपली तक्रार कोणाकडे करावी हा देखील प्रश्न चांदुर बाजार तालुक्यातील राशन लाभार्थी यांच्या समोर उभा आहे.कारण तालुक्याचे पुरवठा निरीक्षक पद हे काही महिन्यांपासून रिक्त आहे.त्यामुळे नागरिकांच्या समस्येला कोण सकारात्मक प्रतिसाद देणार हा प्रश्न तालुकवासी यांच्या समोर उभा आहे.
ज्या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याचे अादेश अाहेत त्याला तिलांजली देऊन अापल्या साेयीप्रमाणे दुकाने उघडण्याचे मनमानी धाेरण राबवले जात अाहे. परिणामी, दुकानदारांची वाट पाहण्याची वेळ सामान्य लाभार्थीवर अाली आहे. रिकाम्या हाती परत गेलेल्या लाभार्थ्यांनी दुकानदारांशी संपर्क साधल्यास तुम्ही वेळेत अाले नाहीत म्हणून धान्य परत गेले, अशी उत्तरेही देऊन ग्राहकांना माघारी पाठवले जात असल्याच्या तक्रारी अाहेत. तर बायोमेट्रिक पद्धतीने अधिक पारदर्शकता येणार असल्याचे पुरवठा विभाग सांगत असले तरी तालुक्यातील मोजकेच राशन दुकानदार पावती देतात.काहींना पावती मागतील असता ते लाभार्थी यांच्यासोबत वाद करतात त्यामुळे या अडचणीमुळे स्वस्त धान्य दुकानांच्या अनागोंदी कारभाराची भर पडत आहे.
शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे नागरिकांच्या सुविधेसाठी शहरातील स्वस्त धान्य दुकाने सकाळी चार तास दुपारनंतर चार तास तसेच, ज्या ठिकाणी आठवडे बाजार अाहे तेथे पूर्णवेळ दुकाने खुली ठेवून लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्याचा नियम आहे. मात्र, शहरातील बहुतांश रेशन दुकानदार नागरिकांच्या अडचणी वा कोणत्याही कारवाईची भीती बाळगता सवडीनुसार दुकाने सुरू ठेवत असल्याचे दिसत आहे. दुकान कधी सुरू होणार याची माहिती नसल्याने लाभार्थ्यांना हक्काचे धान्य मिळविण्यासाठी या दुकानांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
तालुक्यातील अनेक धान्य दुकानांची पाहणी केली असता दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी ते १२ दुपारी ते असल्याच्या माहितीचे फलक लावण्यात आल्याचे आढळले. प्रत्यक्षात मात्र  अनेक दुकाने सकाळी १० सायंकाळी नंतरच खुले होत असल्याचे समोर आले. दुकानाच्या अनियमिततेमुळे अनेकांना आपल्या कार्डावरच्या धान्यावर पाणी सोडावे लागते. नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीकडे पुरवठा विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

धान्यदुकानदारांना वेळेत धान्य मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी अाहेत. । पुरवठा विभागाकडूनच धान्यच आले नसल्याची उत्तरे लाभार्थ्यांना दिली जातात. जेव्हा धान्य येते तेव्हा लाभार्थी नसतात. नागरिकांकडून धान्य आल्याबाबत दुकानदारांकडे अनेकदा विचारणा केली जाते. मात्र, या दुकानदारांकडून या महिन्याचे धान्य आले नाही, यंदा कमी धान्य प्राप्त झाले, पुढील आठवड्यात चक्कर मारा, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. असे प्रकार गैरप्रकारांसाठी पाेषक ठरत असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे.