सावंगा (विठोबा) येथील श्री कृष्णाजी उर्फ अवधुत बुवा संस्थानची नवीन कार्यकारीणी गठीत-अध्यक्षपदी रामटेके तर सचिवपदी राठोड यांची वर्णी

0
557
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात प्रसिध्द असलेले चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा (विठोबा) येथील श्री कृष्णाजी उर्फ अवधुत बुवा संस्थानची नवीन कार्यकारीणी नुकतीच गठीत करण्यात आली असुन यामध्ये अध्यक्षपदी वामनराव रामटेके तर सचिवपदी गोविंदराव राठोड यांची वर्णी लागली आहे.
सावंगा (विठोबा) येथील अवधुत बुवा संस्थान र.नं. १६११ ची सभा संस्थानच्या सभागृहात नुकतीच पार पडली. यामध्ये नवीन कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली. संस्थानच्या अध्यक्षपदी वामनराव रामटेके, उपाध्यक्षपदी कृपासागर राऊत, सचिवपदी गोविंदराव राठोड तसेच कार्यकारीणी सदस्यपदी हरिदास सोनवाल, दत्तुजी रामटेके, फुलसिंग राठोड, विनायक पाटील, पुंजाराम नेमाडे, दिगांबर राठोड, अनिल बेलसरे, स्वप्निल चौधरी, वैभव मानकर यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यकारीणीची निवड झाल्यानंतर सभेमध्ये संस्थानच्या वतीने सुरू असलेल्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला. या पुर्वीच्या पदाधिकाऱ्यांचे प्रगतीपर बांधकाम करण्यात आल्याने यावेळी अभिनंदन करण्यात आले. नवीन कार्यकारीणीचे अवधुत भक्तांकडून कौतुक होत आहै.