नरखेड तालुक्यातील मालापूर  गावाची पाणीदार गावाच्या दिशेने वाटचाल – श्रमदानात फार्मा आरंभ संस्थेचा उल्लेखनीय सहभाग

0
979
Google search engine
Google search engine

फार्मा आरंभ ग्रुप चे ८ एप्रिल पासून प्रत्येक रविवारी श्रमदान  ! 

वॉटर कप  स्पर्धेमध्ये  श्रमदान करून केला वाढदिवस  साजरा ! 

विशेष प्रतिनिधी /

सत्यमेव  जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये नागपूर येथील फार्मा आरंभ  संस्थेतर्फे 8 एप्रिल पासून प्रत्येक रविवारी मलापूर येथे महाश्रमदान करून वॉटर कप स्पर्धेमध्ये गाव  पाणीदार  करण्यासाठी अभिनव  उपक्रम सुरु केला फार्मा आरंभ टीम ने मालापूर येथे प्रियंका गुप्ता हिचा वाढदिवस मालापूर येथे श्रमदान करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,  नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मालापूर  गावातील सर्वानी एकत्र येत गावाला पाणीदार करण्याचा निर्धार करीत पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धेच्या पहिल्या दिवसाच्या माध्यरात्रीपासूनच श्रमदानाला सुरवात केली आहे

नरखेड तालुक्यात मालापूर  गावाला आजूबाजूने शेती व  जंगल आहे शेती व जंगलातील पाणी वाहून जात असल्याने याचा विशेष फायदा गावाला न झाल्यामुळे गाव अजूनही तहानलेलेच आहे गावात पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची समस्या बिकट झालेली असून गाव आज दुष्काळाच्या झळा भोगत आहे .

दुष्काळमुक्त गाव करण्याचा ध्यास घेतल्या मालापूर  गावातील सर्व लोकांनी एकत्र येत आपले गाव जलयुक्त व पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सहभागी करण्यासाठी प्रयत्न केला स्पर्धेत सामील होऊन श्रमदानाच्या माध्यमातून गावाला जलयुक्त करण्याचा निश्चय उराशी बाळगून गावातील लहान थोर एकत्र आले आणी श्रमदानाला सुरवात झाली 8 वर्ष्याच्या विद्यार्थ्यांपासून ते ८० वर्षाच्या जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्व श्रमदानात सहभागी झाले ८ एप्रिल पासून सुरू झालेल्या श्रमदानात आजवर गावकऱ्यांनी एकत्र येत सीसीटी , कंटूर  ग्रेडेट,  पूर्ण केले असून स्पर्धेच्या कालावधीपर्यंत काम पूर्ण करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे

गावातील प्रत्येक व्यक्ती गावाला पाणीदार करण्याच्या दृष्टीने श्रमदान करीत असून श्रमदानाच्या ठिकाणी गावाला पाणीदार करण्यासाठी विविध संकल्पनावर विचार विनिमय होतो यासाठी जिल्ह्यातील विविध संस्था व जलमित्रासह अनेकांचे योगदान आहे .

मालापूर  गावातील नागरिकांनी एकत्र येत सुरू केलेले श्रमदान गावाला नंदनवन करण्याच्या दृष्टीने खूप मोठा संदेश देणारे असून याची दखल विविध सामाजिक सेवा संस्थेने घेऊन मालापूर  येथे सुरू असलेल्या श्रमदानात सहभागी होऊन या स्पर्धेसाठी

मालापूर येथे 8 एप्रिल पासून श्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते या श्रमदानाकरीता नागपूर येथिल फार्मा आरंभ गृप जो व्यवसायाने  एमआर आहे जवड जवळ ५० लोकांचा हा ग्रुप ८ एप्रिल पासून दर रविवार ला श्रमदान करण्याकरिता येतो आहे,  श्रमदानातून सिसिटी , ग्रेडेड कंटूरचे काम केले व गावकऱ्यांचा उत्साह वाढविला.यावेळी शासकीय अधिकारी  यांनी सदिच्छा भेट देवून श्रमदान केले तसेच,  गावकरी मंडळी यांचा सक्रिय सहभाग आहे यावेळी फार्मा आरंभ टीम ने स्पर्धेच्या काळामध्ये  सुटीचे  संपूर्ण दिवस गाव पाणीदार करण्यासाठी श्रमदानाच्या माध्यमातून गावकर्यांसोंबत  खांद्याला खांदा  लाऊन श्रमदान केले,  आणि त्यांनी गावामध्ये  जनजागृती करून गाव पाणीदार करण्यासाठी पुढाकार घेतला फार्मा आरंभ टीम ने प्रियंका  गुप्ता हिचा वाढदिवस श्रमदान करून साजरा केला त्यावेळेस फार्मा आरंभ  ग्रुप चे अभय शास्त्री , सरपंच अंकुश धुर्वे,  उप सरपंच लखन कडबे ,  पानी  फाउंडेशन तालुका  समन्वयक  रुपेश वाळके, आकाश वाडिभस्मे, फाऊंडर, मनोज खडसे, फाऊंडर, किरण देशमुख, संजय बेले, जितेंद्र इंगळे,  नविन जैन, मनोज जवळे, महेश टेकाडे,  हरीष शहाडे, आशीष उरकुंडे, सुनील कुंभारे, वृषाली शारदा, प्रियंका गुप्ता, उज्वला घुमे, सविता धनकर, सोनाली ठाकरे, शामली चव्हाण, नवीन वानखेडे, आशीष रामगिरीवार, सौरभ हिवरकर,  इ. सक्रिय कार्यकर्ते आहेत.

मालापूर येथील गावकरी , प्रशिक्षणार्थी यानी शेकडो लोकांनी  श्रमदान केले यासाठी फार्मा आरंभ ग्रुपने सहकार्य या श्रमदानासाठी केले .

एकेकाळी पाण्याची समृद्धता असणाऱ्या मालापूर  गावाची दुष्काळसदृश झालेली परिस्थिती बदलून गावाला पाणीदार करण्यासाठी एकदिलाने एकत्र आलेल्या मलापूर  गावाचे  नाव पाणीदार गावाच्या यादीत महाराष्ट्राला पहायला मिळेल हाच विश्वास येथील प्रत्येक व्यक्ती व्यक्त करीत आहे.