सिंदेवाही ग्रामीन रुग्णालय स्वत:च आजारी……

0
680
Google search engine
Google search engine

खालिद पठान/ सिंदेवाही-

 

सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीन रुग्णालय नागरिकांकरीता डोकेदुखी ठरित आहे. या रुग्नालयात डॉक्टरांची गैरहजेरी, उपचारास विलंब, रुग्नांशी असभ्य वागणूक व नर्स चा रुग्नांशी  व्यवहार चांगला नाही  आदि कारनामुळे हे रुग्णालय स्वत:च आजारी झाले आहे.

ओपीडी च्या वेळेवर न येता डॉकटर उशिरा येतात. विशेष म्हणजे, महत्वाच्यावेळी रुग्नन्ना उपचार दिला जात नाही, ही नेहमीची नागरिकांची ओरड आहे. यातूनच डॉक्टर कर्मचारी आणि रुग्नांच्या नातेवाहिकांत वाद प्रसंग होतांना दिसुन येते. रुग्नालायत स्वच्छता ही पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छता केलेली दिसत नाही. शौचालयाची श्तिती अतिशय दयनीय असुन काना-डोळा केला जात आहे. बहुतांश कर्मचार्याना निवासस्थान असुन ही बाहेर गावावरून ये-जा करतात. कोण कधी येतो कोण कधी जातो याचा काही नेम नाही. एखादी तक्रार करायची असल्यास कुणाकडे करायची हा मोठा प्रश्न तालुक्यातील रुग्नन्ना आहे. शवविच्छेदन करतांना नातेवाहिकांना अनेकदा मन:स्ताप सहन करावा लागतो. नातेवहिकांना डॉक्टरांची तासनतास प्रतीक्षा करावी लगते. नातेवहिकांना एकीकडे दुःख तर दुसरीकडे डॉक्टरांकडून होणारा मन:स्ताप आशा वारंवार होणार्या प्रकारामुळे सिंदेवाही तालुक्यातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी अनेकदा डॉक्टर रुग्नालयात उपस्थीत राहत नाही. अपघातग्रस्त रुग्न असल्यास डॉक्टरांना फोन लावला जातो. ड्यूटीवर असणारे डॉक्टर आपल्या सोईनुसार येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आरोग्य अधिकारी पत्रकारांशी सवाद साधन्यास टाळा-टाळ करतात त्यामुळे सिंदेवाही तालुक्याचे मुख्य ग्रामीन रुग्णालय स्वत:च आजारी असल्याचे चित्र दिसत आहे तरी सिंदेवाही नागरिकांची रुग्नसेवेकडे विशेष लक्ष देण्याची मांगनी केली जात आहे.