सिंदेवाही तालुक्यातील शिवनी-रत्नापूर मार्गाची दुरावस्था

0
526
Google search engine
Google search engine

खालिद पठान / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील शिवणी- रत्नापूर हा सात किमी अंतराचा रस्ता आहे. सदर रस्ता डांबरीकरणाचा आहे. पंरतु डांबरीकरण जागोजागी उखडल्याने खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे प्रवास करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही बळावली आहे. .

तालुक्यातील या परिसरातील नवरगाव हे मोठे गाव असून तेथे परिसरातील नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. शिवनीवरून याच रत्नापूर मार्गाने नवरगावला जावे लागते. या मार्गाने शिवनी, वासेरा,सिंगडझरी, सिरकाडा, पिपर्डा, पळसगाव आदी गावातील जनतेला प्रवास करावा लागतो. सध्या या सात किमी अंतराचे डांबरीकरण उखडलेले असल्याने जागोजागी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून,जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या गंभीर समस्येकडे संबंधित विभागाने लक्ष देवून या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.