मृगनक्षत्राला कोकडी येथे दमा औषधी वितरण कार्यक्रमाची आमदार कृष्णाजी गजबे यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

0
739
Google search engine
Google search engine
निलेश मेश्राम / वडसा:- 
मौजा कोकडी, ता.देसाईगंज येथे मागील अनेक वर्षांपासून मृगनक्षत्राला कोकडी गावातील वैद्यराज श्री.प्रल्हादजी कावळे हे निशुल्क दमा औषधीचे वितरण करीत असतात. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातीलच नव्हेतर पूर्व विदर्भातुन तथा शेजारच्या राज्यातून सुध्दा मोठ्या प्रमाणात दमा औषधीचा लाभ घेण्यास रुग्ण उपस्थित राहत असतात.
      त्याच अनुषंगाने दिनांक ८ जून २०१९ ला सायंकाळी ०६ वाजून ते दि.९ जून २०१९ ला सकाळी ६ वाजेपर्यंत वैद्यराज श्री.प्रल्हादजी कावळे हे दमा औषधीचे वितरण करणार आहे.
            त्यामुळे यावेळी सुद्धा दमा औषधीचा लाभ घेण्यास येणाऱ्या रुग्ण व नागरिकांची गैरसोय होणार नाही. याकरिता गर्दी , पिण्याचे पाणी तथा इतर महत्त्वाचे बाबीचे योग्य नियोजन करण्याचे दृष्टीने दिनांक २६ मे २०१९ ,रविवार रोजी सकाळी ११ वाजता ,कोकडी ग्रामपंचायत कार्यालयात मा.आमदार कृष्णाजी गजबे याच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी वैद्यराज श्री .प्रल्हादजी कावळे , जि.प सदस्य रोशनीताई पारधी ,देसाईगंज पंचायत समिती उपसभापती उईकेजी ,सरपंच सुधीरजी वाढई ,ग्रामसेविका एस. के.टेम्बुने ,उपसरपंच पुष्पाताई विरघरे ,पो.पा पुरुषोत्तमजी कापगते ,त.मु.स अध्यक्ष रामू सहारे , व समस्त ग्रामवासीय उपस्थित होते