येवदा ग्रामपंचायत येथील कामांचे माहिती दर्शक फलक लावण्यात यावे…. प्रहार संघटनेचे सरपंच,ग्रामसेवक यांना इशारा…..

307
जाहिरात
प्रतिनिधी / येवदा –
दर्यापुर तालुक्यातील येवदा ग्रामपंचायत मधील लोकार्पण झालेल्या तसेच सुरू असलेल्या कामांचे माहिती दर्शक फलक लावण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे सरपंच, प्रदिप देशमुख व ग्रामविकास अधिकारी,राजेंद्र चौखंडे यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदिप वडतकर यांनी केली आहे येवदा ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामे मंजुरी झाल्यावर ज्या संबंधित ठेकेदाराला काम मिळते त्या ठेकेदाराने काम सुरु करण्या अगोदर बांधकाम तसेच इतर कामे दर्शक तक्ता जन हिताच्या दृष्टीने लावणे आवश्यक आहे, शिवाय शासनाचे तसे आदेश देखील आहे,करिता ग्रामपंचायत अंतर्गत गाव परिसरात जी कामे चालू आहेत तसेच अलीकडेच लोकार्पण झालेल्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराला बांधकाम दर्शक तक्ते अजून पर्यत ग्रामपंचायत परिसरात दिसून येत नसल्यामुळे सदर परिसरातील कामे कोणत्या विभागाकडून होत आहे याची माहिती मिळत नही,त्यामुळे यातून भ्रष्टाचाराच्या घटना देखील होत असतात अशावेळी संबंधितांना जाब विचारण्याच सर्व सामान्यांचाअधिकार आहे,त्यामुळे कामचे फलक विभाग,कंट्रातदार आणि अधिकारी यांच्या मोबाइल सह लावण्यात यावे अन्यथा संबंधित ठेकेदारांचे काम बंद करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हासंपर्क प्रमुख प्रदीप वडतकर यांनी दिला आहे. या बाबत चे निवेदन त्यांनी मुख्य कार्यकारी अभियंता, गट विकास अधिकारी ,सरपंच,ग्रामसेवक यांना दिले आहे.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।