महानिर्मिती औ.वि. केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार व निरोप समारंभ संपंन्न

0
1100
Google search engine
Google search engine

बीड:नितीन ढाकणे

महानिर्मिती औष्णिक विद्युत केंद्र परळी येथील सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार व निरोप समारंभ दि.३१ मे २०१९ रोजी थर्मल येथील स्वामी विवेकानंद वाचनालयात संपन्न झाला. फुले-आंबेडकरी विचाराचे विज्ञानवादी, कर्तबगार अधीक्षक अभियंता ए. एन. पापेवार यांचा सत्कार करतांना मुख्य अभियंता प्रकाश खंदारे . सेवानिवृत्तीमध्ये अधिकारी कर्मचारी यात अधीक्षक अभियंता ए. एन. पापेवार, यांच्यासह देशमुख शंकर, भोसले महादेव, मरळ बाळासाहेब, पाटील भाऊराव, बालाजी गोरे, शेख मुसा मर्तुजा, कुरकुट भारतकुमार, पवार काशिनाथ यांना निरोप देण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य अभियंता प्रकाश खंदार, उपमुख्य अभियंता राऊत, कामगार अधिकारी एस. पी. वासुदेव साहेब, ए.बी.वानखेडे साहेब, महेंद्र शिंदे आदींची कार्यक्रमाला उपस्थिती होती.