अंजनगाव सुर्जी येथे पॉवर ऑफ मीडियाची तालुकास्तरीय बैठक संपन्न

0
550
Google search engine
Google search engine

तालुक्यातील पत्रकारांचे निर्णायक नियम, विविध कार्यक्रमाचे केले नियोजन
●●●●
अंजनगाव सुर्जी : संपूर्ण जिल्हासह राज्यात पत्रकारांचे हक्काचे व्यासपिठ व पत्रकारांच्या समस्या शासनापर्यत पोहचविणारी द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनच्या अंजनगांव सुर्जी तालुका व शहराची बैठक बुधवार दिनांक ५ जून रोजी स्थानिक शासकीय विश्राम गृह येथे राज्य संघटक व संस्थापक सदस्य संदीप बाजड, जिल्हाध्यक्ष उमेश लोटे यांच्या माहिती वरून विदर्भ सदस्य ऋषिकेश वाघमारे, तालुका अध्यक्ष मनोहर मुरकुटे, शहर अध्यक्ष प्रविण बोके नेतृत्वाखाली संपन्न झाली, या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करुण येणाऱ्या वर्षात विविध कार्यक्रम राबविण्याकरिता ठराव पारित करण्यात आले.

अंजनगाव सुर्जी शहरात पत्रकारांना हक्काची जागा असावी व सभागृह व्हावे यासाठी आमदार रमेशराव बुंदिले, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांच्या पुढाकाराने होणार असुन ते काम तात्काळ मार्गी लागावे, याकरीता शासकीय कागदपत्राची पूर्तता करून हक्काचे व्यासपीठ स्थापन करून घेऊ या असे सर्व पत्रकारांनी एकमतानी ठरविले आहे, त्याचबरोबर पत्रकार संघटनेच्या वतीने जूलै महिण्यात वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आँगस्ट महिण्यात रोगनिदान शिबिर, सप्टेंबर मध्ये रक्त तपासणी शिबिर व पत्रकारांच्या समस्या निकाली काढाव्या या करीता सर्व पत्रकारांनी एकत्र यावे असे बैठकीत ठरविण्यात आले.

या बैठकीला अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार सुरेशदादा साबळे होते, तर प्रमुख पाहूणे म्हणून अशोक पिंजरकर, वासुदेवराव काळबाडे, गजेन्द्र मंडलीक, राजेन्द्र झाडे, पवन गोतमोरे, नंदकीशोर पाटील, जयेद्र गाडगे. मनोहर भोपळे, गजानन चांदूरकर, अनंत पानझाडे, गिरीष लोकरे उपस्थित होते. संचालन प्रविण बोके यांनी केले.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*अंजनगाव सुर्जी पत्रकार संघाकडून स्व. रमेशराव डकरेना श्रद्धांजली.*
——/——
पॉवर ऑफ मीडिया अमरावती जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य बादलजी डकरे यांचे वडील रमेशरावजी डकरे यां चे दिनांक 5 जून रोजी दुःखत निधन झाले, त्यांच्या निधनाबद्दल आज पत्रकार संघटनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.