पोलिस स्टेशन सिंदेवाही यांच्यावतीने इफ्तार संपन्न

0
603
इफ्तार पार्टी निमित्य मुस्लिम बांधवांंना मार्गदर्शन करतांना तहसीलदार अमोल पाठक
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- ०४/०६/२०१९  रोज मंगळवार पोलिस स्टेशन सिंदेवाहीच्या आवारात येथे  पोलिस स्टेशन सिंदेवाही यांच्यावतीने इस्लाम धर्मीय मुस्लिम समाजाचा पवित्र माह रमजान च्या शुभपर्वावर नियमित दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा “दावत-ए-इफ्तार” इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते.

                या इफ्तार पार्टिमध्ये विशेष करुण त्यानी पोलिस स्टेशन सिंदेवाहीच्या आवारात या शुभपर्वाच्या प्रसंगी सर्वप्रथम अब्दुल कादिर मुशाहीदी हाफ़िज़-इमाम (धर्मगुरु) जामा मास्ज़िद सिंदेवाहि यांचे सत्कार पोलिस उपविभागीय अधिकारी परदेशी ब्रम्हपुरी यानी केले. इस्माइल अहमद शेख अध्यक्ष इंतेजामिया कमेटी जामा मास्ज़िद सिंदेवाही यांचे स्वागत सिंदेवाही पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी केले.

या कार्यक्रमाच्या मंचावर अमोल पाठक तहसीलदार सिंदेवाही, पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत परदेशी ब्रम्हपुरी, सिंदेवाही पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके, अब्दुल कादिर मुशाहीदी हाफ़िज़-इमाम (धर्मगुरु) जामा मास्ज़िद सिंदेवाही, इस्माइल अहमद शेख अध्यक्ष इंतेजामिया कमेटी जामा मास्ज़िद सिंदेवाहि, मिया खा पठान मोहज्जन.

                प्रास्ताविकात सिंदेवाही पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी मुस्लिम बांधवांना अफ्तार करण्याकरीता वेळेवर कार्यक्रम स्थळाचे बदल झाल्यामुळे मुस्लिम बांधवांना झालेल्या त्रासाबदल दिलगिरी व्येक्त केली आणि रमजान ईदच्या सुभेछा दिल्या. याप्रसंगी ब्रम्हपुरी पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत परदेशी यांनी मुस्लिम समाजाला इफ्तार पोलिस विभागातर्फे प्रत्येक वर्षी दिला जातो यावर्षी सुद्धा पोलिस स्टेशनच्या आवारात मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याबदल मुस्लिम समाजाचा मनपूर्वक आभार मानून रमजान ईदच्या सुभेछा दिल्या. अब्दुल कादिर मुशाहीदी हाफ़िज़-इमाम (धर्मगुरु) जामा मास्ज़िद सिंदेवाही यांनी रोजा व इफ्तार तथा रमजान संमंधी माहिती दिली. अमोल पाठक तहसीलदार सिंदेवाही यांनी मुस्लिम समाजाला अमन व शांतीचा संदेश दिला व रमजान ईदच्या सुभेचा दिल्या  इफ्तार पार्टी च्या आयोजनार्थ प्रसंगी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्येक्त केले.

प्रसंगी या इफ्तार पार्टी च्या आयोजनात विशेषतः इंतेजामिया कमेटिचे सर्व पदाधिकारी जाहिदखां पठान, रियाज (बबलू) शेख, वसीम खान, सजावर खान, नोमान कुरेशी, युसुफभाई शेख माजि सचिव, इब्राहिम शेख माजी सचिव, अमानभाई कुरेशी, सफीर पठान, वहाबआली सैय्यद, आदिल शेख, मोनीष शेख, हाफिज शेख, समीर खा पठान, सलाम कुरेशी, अजीम कुरेशी, वाशिम शेख  सोबतच बहुसंख्यने मुस्लिम समाजबांधव उपास्थित होते तसेच प्रामुख्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक गोमेद पाटिल, एपीआय राठोड पोलिस स्टेशन तलोधी, प्रा. रिजवान शेख, पत्रकार प्रशांत गेडाम, मिथुन मेश्राम आदि उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संचालन वहाबअली सय्यद यांनी केले तर आभार प्रदर्शन जामा मास्ज़िद सिंदेवाहीचे सचिव नासिरअंसारी यानी केले.