बरेली (उत्तरप्रदेश) येथे रस्त्यावर नमाजपठण केल्यावरून १०० जणांवर गुन्हा नोंद

0
517
Google search engine
Google search engine

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील चौकी चौकात असणार्‍या मजारच्या समोर रस्त्यावर नमाजपठण करण्यावरून पोलिसांनी इमाम, त्यांचा मुलगा आणि अन्य १०० जण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

१. या मजारसमोरील रस्त्यावर प्रत्येक शुक्रवारी नमाजपठण केले जाते. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होते. या कारणावरून येथील नूतन पोलीस अधीक्षक अभिनंदन सिंह यांनी रस्त्यावर नमाजपठण करण्यावर बंदी घातली आहे.

२. यामुळे शुक्रवार, ७ जूनला नेहमीपेक्षा अधिक संख्येने  या बंदीच्या विरोधात नमाजपठण करण्यासाठी रस्त्यावर आले. तेव्हा पोलिसांनी त्यांना नमाजपठण करण्यापासून रोखले.

३. यामुळे भडकलेल्यानि पोलीस ठाण्याला घेराव घातला. तसेच पोलिसांशी वाद घातला. येथील पोलीस निरीक्षक पंकज वर्मा यांना धमकी देऊन ते परत मजार समोरील रस्त्यावर नमाजपठणासाठी गेले.

४. यानंतर पोलिसांनी अधिक कुमक मागवून  नमाजपठण केल्यावर कठोर कारवाई करण्याची चेतावणी दिली.