चांदूर रेल्वे न.प. उर्दु शाळेचा ८१.४८ टक्के निकाल आयेशा अंजुम मुहम्मद युनूस शाळेतुन प्रथम

223
जाहिरात
चांदूर रेल्वे – (Shahejad Khan)
      राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर घोषीत करण्यात आला. यामध्ये स्थानिक नगर परीषद मौलाना आझाद उर्दु हायस्कुलचा ८१.४८ टक्के निकाल लागला असुन आयेशा अंजुम मुहम्मद युनूस हि शाळेतुन प्रथम आली आहे.
       स्थानिक नगर परीषद मौलाना आझाद उर्दु हायस्कुलमधील एकुण २७ विद्यार्थी परिक्षेला बसले असता २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामधील ७ प्रथम श्रेणीत व ९ व्दितीय श्रेणीत व ६ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. शाळेमधून आयेशा अंजुम मुहम्मद युनूस ही ७० टक्के गुण घेऊन प्रथम आली आहे. तर नाजनिन कौसर इरफान खान ही ६९.६० टक्के गुण घेऊन व्दितीय व उम्मे कुलसूम शेख युनूस ही ६८.४० टक्के गुण प्राप्त करून तृतीय आली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुने, मुख्याध्यापक अब्दुल करीम, वर्ग शिक्षक मोहम्मद वसीम, अय्युब पठाण, विकार शाह आणि अर्शिया जबीन, सर्व नगरसेवक, शहरवासी आदींनी अभिनंदन केले आहे.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।