पॉवर ऑफ मीडिया संघटनेत धामणगांव रेल्वेच्या पत्रकारांचा जाहीर प्रवेश-मोफत रक्तदान व तपासणी शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद

0
888
Google search engine
Google search engine

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहर व तालुक्याचे अभ्यासू व धडाडीचे पत्रकार तसेच सर्वांच्या मदतीला नेहमी पुढाकार घेणारे आमचे मित्र पत्रकार दैनिक भास्करचे प्रतिनिधी राजेशजी चौबे, दैनिक लोकमतचे प्रतिनिधी मोहनजी राऊत, जनमाध्यमचे प्रतिनिधी व माऊली भक्त प्रदीपजी भुसारी, मंगरूळ दस्तगीरचे देशोन्नती प्रतिनिधी व युवा पत्रकार उमेश भुजाडे, लोकमतचे शहर प्रतिनिधी माधवराव शेंडे, पुण्यनगरीचे प्रतिनिधी गणेश कडू यांच्यासह तालुक्यातील एकूण 12 पत्रकार बांधवांनी पॉवर ऑफ मीडियाला एकतर्फी पाठबळ देत राज्य संघटक संदीप बाजड यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला.*

धामणगाव रेल्वेच्या स्थानिक पत्रकारांचा जाहीर प्रवेश आयोजित जागतिक रक्तदान दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय येथील रक्तदान व तपासणी शिबिर दरम्यान द पॉवर ऑफ मिडीया या पत्रकारांच्या संघटनेत अधिकृतरित्या प्रवेश घेतला. यावेळी प्रवेश घेणाऱ्या पत्रकारांना स्मृतिचिन्ह तसेच वृक्ष देऊन पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष उमेशजी लोटे यांच्या यांचे हस्ते सत्कार करून सन्मानित करण्यात आले.

या बैठकीला पॉवर ऑफ मीडियाचे संस्थापक सदस्य तथा राज्य संघटक संदीपजी बाजड, विदर्भ प्रदेश सदस्य उत्तम ब्राम्हणवाडे, अमोलजी नानोटकर, जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद वकील दानिश सर, जिल्हा सरचिटणीस सुभाषजी कोटेचा, जिल्हा सदस्य आशिषजी गवई, संजयजी पांडे, छगनजी जाधव, धामणगाव रेल्वेचे तालुकाध्यक्ष संजय तुपसुंदरे, शहराध्यक्ष वैभव बावनकुळे, चेतनजी कोठारी, चांदुर रेल्वे तालुका उपाध्यक्ष राजूभाऊ शिवणकर, नांदगांव खंडेश्वर तालुकाध्यक्ष निकेत ठाकरे, सचिव सागर सव्वालाखे, पवन ठाकरे, अमोल दांडगे यांच्यासह पॉवर ऑफ मीडियाचे सभासद व स्थानिक असंख्य पत्रकार उपस्थित होते.

स्थानिक पत्रकारांनी द पॉवर ऑफ मीडिया या संघटनेवर विश्वास प्रदान करून अधिकृत प्रवेश घेतल्याबद्दल मी संदीप बाजड त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. तसेच रक्तदान आयोजकांचे सुद्धा मनःपूर्वक धन्यवाद..