खानापूर ते मोर्शी रोडवर श्रीराम ट्रॅव्हल्स ची खासगी बस पलटली- 1 महिला ठार 25 जखमी

0
1238
Google search engine
Google search engine

परतवाडा येथील स्थानिक श्रीराम ट्रॅव्हल कंपनीची बस आज अंजनगाव सुर्जीवरून मध्यप्रदेशमधील पांढुर्णा येथे जात होती. दरम्यान, साडेअकरा वाजताच्या सुमारास खानापूर ते मोर्शी रोडवर मधापुरी हनुमान मंदिराजवळ ही बस पलटली. या अपघातात बसमधील एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.