शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून द्या… प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

260
जाहिरात

/दर्यापूर
दर्यापुर तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे दाखले तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी दर्यापुर सौ प्रियंका आंबेकर यांच्याकडे प्रहारचे प्रदिप वडतकर, महेश कुरळकर यांनी केली आहे दहावी बारावीचा निकाल जाहीर झाला असून पुढील शैक्षणिक प्रवेश घेण्याकरता विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे विद्यार्थी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत अशा परिस्थितीत तहसील मधील ऑनलाइन प्रक्रियेत बराच वेळ लागत असल्याने प्रवेशाकरिता लागणारे डोमेशिअल,नॉन क्रिमिलियर,उत्पन्नाचे दाखले सह इतर कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे विद्यार्थ्यांना तात्काळ कागदपत्रे करून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी सौ प्रियंका आंबेकर तसेच तहसिलदार राहुल कुंभार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली तात्काळ कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची ग्वाही संबंधित अधिकारी यांनी दिली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन सादर करतांना प्रदिप वडतकर, सह महेश कुरळकर, सुधीर पवित्रकार, अनूप गावंडे व इतर कार्यकर्ते उपस्थिती होती .

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।