आपआपसात भाईचारा टिकवणे आता काळाची गरज :-डॉ. मा.श्रीराम पानझाडे

0
580
Google search engine
Google search engine

शिक्षक महासंघ च्या वतीने ईद मिलन कार्यक्रम
बुलढाणा :- शिक्षक महासंघ चे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर याच्या संकल्पनेतून यावर्षी अमरावती विभागात वेगवेगळ्या जिल्ह्या मध्ये रमजान ईद च्या पवित्र पर्वावर मुस्लिम व हिंदू शिक्षक बांधवांचे मनोमिलन घडून आनन्यासाठी ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्याच् अनुषंगाने आज दिनांक 17 जून रोजी शिक्षक महासंघ च्या वतीने बुलढाणा येथे उर्दू सेलचे जिल्हा अध्यक्ष अनिस सर यांच्या निवासस्थानी ईद-ए-मिलन निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाला डॉ. पानझाडे साहेब शिक्षणाधिकारी जि प माध्यमिक याची विशेष उपस्थिती होती यावेळी शेख अखतर सर यांनी पुष्पगुच्छ देऊन साहेबांचे स्वागत केले तसेच राम हृदय इंटरप्राईजेस चे संचालक श्री राहुल जी राऊत यांचे स्वागत शेख अशरफ शेख दिलावर शेठ यांनी केले त्याच बरोबर शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष गजेंद्र सिंग राजपूत सर यांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन अनिस सर यांनी स्वागत केले या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने आपण सर्व खुदा चे बंदे आहोत आणि आपल्यामध्ये अशाच पद्धतीचा भाईचारा प्रेमाचे स्नेहसंबंध वृद्धिंगत होत राहो अशा पद्धतीच्या भावना मा. शिक्षणाधिकारी डॉ. पानझाडे साहेब यांनी व्यक्त केल्या सर्व शिक्षक बांधव यांनी शीरखुर्मा चा आस्वाद घेतला .
या कार्यक्रमानिमित्त शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप दांदडे, जिल्हा उपाध्यक्ष समाधान जी वाघ ,जिल्हा सचिव डॉ. संतोषजी सांगळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शेख इम्रान सर; पवार सर ,चव्हाण सर ,धंदर सर ,देशमुख सर, जाधव सर, सपकाळ सर, काळवाघे सर त्याचबरोबर शिक्षक महासंघाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.