भक्ती शक्ती संगम सोहळ्या निमित्त आदरणीय भिडे गुरुजी व सर्व धारकरी युवकांचे स्वागत करणार.– राष्ट्रीय वारकरी परिषद

0
977
Google search engine
Google search engine

पुणे :- महाराष्ट्रातील सर्वात मोठा अध्यात्मिक उत्सव म्हणजे पंढरीची वारी आहे.यासाठी देशभरातून संत परंपरेचा वारसा जपणारे लाखो वारकरी सहभागी होतात या परंपरेची ओळख करून देण्यासाठी तसेच शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचे ध्येय समोर ठेऊन कार्य करणारे लाखो निर्व्यसनी सदाचारी तरुण आदरणीय भिडे गुरुजींनी घडविलेले आहे.
सर्व वारकरी मंडळीनी एकत्र येऊन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या धारकरी मंडळींच्या धर्मध्वजाचे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून तरुणांना प्रोत्साहन द्यावे.
!! कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक। तयाचा हरिख वाटे देवा !! प्रत्येक आई वडिलांना आपला मुलगा निर्व्यसनी थोर मोठ्यांचा आदर करणारा आपल्या प्रथा परंपरेचा सन्मान करणारा असावा हे कार्य खरोखर गुरुजींच्या माध्यमातून होत आहे. अशा तरुणांना माउली ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून सर्वच संतांचे वारकरी मंडळींचे आशीर्वाद व पांडुरंगाची कृपा त्यांच्या छत्रपती शिवरायांचे ३२ मन सुवर्ण सिंहासन व हिंदवी स्वराज्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी राहो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना…