चांदूर बाजार तालुक्यात अवैध धंद्यावर पोलिसांचे दुर्लक्ष मोठ्या प्रमाणावर होत आहे अवैध धंद्या तुन लाखो रुपयांची उलाढाल

0
949
Google search engine
Google search engine

चांदूर बाजार तालुक्यात धंद्यावर पोलिसांचे दुर्लक्ष
मोठ्या प्रमाणावर होत आहे अवैध धंद्या तुन लाखो रुपयांची उलाढाल

बादल डकरे अमरावती /चांदुर बाजार

चांदूरबाजार तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून यामध्ये गावठी दारू वरली मटका यासारखे लहानसान अवैध धंदे सुटले तर गोमास विक्री ,अवैध जनावर तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

त्याचे चांदूरबाजार शिरजगाव कसबा,ब्राह्मण वाडा थडी ,चांदुर आणि आसेगाव या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध सुरू असून हे गाव अवैध धंद्यांची माहेरघर बनले आहे.तर या अवैध धंद्यांना पोलीस विभागामार्फत खतपाणी घातले जात असल्याची चर्चा होत आहे.त्यामुळे अवैध धंद्यावर कार्यवाही होत नसल्याचे दिसत आहे .
मात्र हे अवैध धंदा करणाऱ्या हेच काही ठिकाणी पोलिसांवर आपला प्रभाव टाकून अवैध धंदे सुरू ठेवत आहे. पोलीस स्टेशनमध्ये येऊन दादागिरी करण्यापर्यंत धंदेवाल्यांची मस्करी वाढली .असून यांच्यावर अंकुश लावणार तरी कोण ?वरिष्ठांना या सर्व गोष्टींची माहिती असून देखील वरिष्ठ अधिकारी या सर्वावर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे .
मात्र यावर ठाणेदार यांनी कारवाई न केल्यास यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे.तालुक्यातील चांदुर बाजार पोलिस स्टेशन अंतर्गत येणारे ब्राह्मणवाडा थडी ,शिरजगाव कसबा, आणि आसेगाव याठिकाणी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैधपणे रेतीची वाहतूक सुरू असून यांच्यावर पोलिसांचा अंकुश नसून पोलीस ह्या सर्व गोष्टी वर दुर्लक्ष करीत आहे. शिरजगाव कसबा सारख्या गावात काही ठिकाणी अवैध वाळू तस्करी करणारे हे पोलिसांच्या संपर्कात असून आपली देवाण-घेवाण करून या ला व्यवहार सुरू करत आहेत. तर या सर्वांमुळे पोलीस विभाग सुद्धा या होत असलेले अवैध धंदे वर दुर्लक्ष करत आहे.
तहसील कार्यालयामध्ये महसूल विभाग सुद्धा यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत वाटत आहे कारण मागील काही दिवसांमध्ये तलाठी आणि तहसीलदार यांच्यावर सुद्धा अवैध वाळू तस्करी करणारे यांनी हल्ला केला होता या प्रकरण मात्र तरी सुद्धा अवैध धंदे ,आणि वाळू तस्करी यावर योग्य ती कारवाई झाली नसल्यामुळे अवैध वाळू तस्करांवर कारवाई करणार तरी कोण? पुन्हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे .चांदूरबाजार ते तहसीलदार उमेश खोडके हे आपल्या दौऱ्या दरम्यान कारवाई करत आहेत. पोलीस विभाग आपल्या स्वार्थासाठी या कारवाईकडे दुर्लक्ष करीत आहे .तर महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे चित्र तालुक्यात आहे. यामध्ये सर्वप्रथम चांदुर बाजार पोलिस स्टेशन शिरसगाव कसबा पोलीस स्टेशन पाहण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याने अवैध वाळू तस्करी करणारे हे याठिकाणी पोलिसांच्या संपर्कात असल्याचे दिसत आहे. तर यामुळेच पोलिस स्टेशन अंतर्गत अद्यापही वाळू तस्करांवर कारवाई झाली नाही.कार्यवाही न झाल्यामुळे या ठिकाणी कार्यरत असणारे महसूल विभागाचे कर्मचारी हे या होत असलेल्या वाळू तस्करी वाढत असलेले दुर्लक्ष करीत आहे.पोलीस विभाग सुद्धा आपले आर्थिक हितसंबंध जोपासात असल्याचे चित्र दिसत आहे. चांदूरबाजार पोलीस स्टेशनचे ठाणेदार उदयसिंग साळुंखे, ठाणेदार अशोक कांबळे , ब्राह्मण वाडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सचिन परदेशी ,आसेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार नंदकुमार काळे यांनी या विरुद्ध कारवाई केली नाही तर चांदूरबाजार तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार असल्याचे चित्र सध्यातरी होत असलेल्या अवैध धंद्यावरून दिसून येत आहे.तर तालुक्यातील अनेक ठिकाणी गुटखा विक्री करणारे हे त्या क्षेत्रातील किंग बनले आहे. त्यामध्ये दिवसाला हजारो रुपये कामविले जात आहे.त्यांच्याकडून होत आहे तर लाखो मधला काही वाटा हा पोलीस विभाग यांना जात असल्याचे अवैध धंदा करणारे बोलत आहे. अमरावती येथील ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप झळके या सर्व गोष्टीवर काय कारवाई करणार हा देखील एक प्रश्न सध्या चांदूरबाजार तालुक्यामधील अवैध धंद्यावर चर्चेचा विषय ठरत आहे.