आज मांजरखेड (कसबा) येथे एका जागेकरीता मतदान – ग्रामपंचायत सदस्यपदाची पोटनिवडणुक

0
1028
Google search engine
Google search engine

३ जागी अविरोध तर एका जागी नामांकन अर्जच नाही

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)

माहे जूलै २०१९ ते सप्टेंबर २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतची पोटनिवडणुक आज होणार असुन तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथे आज रविवारी एका सदस्यपदाकरीता मतदान होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

चांदूर रेल्वे तालुक्यात ५ ग्रामपंचायतच्या ५ सदस्यपदाकरीता पोटनिवडणुक होणार होती. यामधील टोंगलाबाद प्रभाग क्रं. १ मध्ये दिनेश रामदास भांगे, टेंभुर्णी प्रभाग क्र. २ मधून छाया संदिप राऊत, व राजना प्रभाग क्र. २ मधून नलीनी मुरलीधर गावंडे यांची अविरोध निवड झाली आहे. तर निमगव्हाण प्रभाग क्रं. २ च्या सदस्यपदाकरीता एकही अर्ज दाखल झाला नाही. याशिवाय तालुक्यातील मांजरखेड कसबा येथील प्रभाग क्रं. ३ मध्ये आज रविवारी सकाळपासुन ईव्हीएम मशीनव्दारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या एका सदस्य पदाकरीता दोन उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असुन इलेक्शन पार्टी शनिवारी मांजरखेडला रवाना झाली. आज प्रत्यक्ष मतदान मांजरखेड (कसबा) येथे सकाळी ७ पासून ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत राहील. मतदान केंद्रावर १ मतदान केंद्राध्यक्ष असुन ३ मतदान अधिकारी केंद्रावर पोहचले होते तर एक चमु राखीव राहणार आहे. निलेश स्थुल निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन काम पाहत असुन सोनारकर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन काम पाहत आहे.

(बॉक्समध्ये घेणे)

यांचे भाग्य होणार ईव्हीएम मध्ये बंद

मांजरखेड (कसबा) येथे होणाऱ्या निवडणुकीकरीता सुनंदाबाई भिमराव बोबडे व अतुल काशीनाथ सवाई या दोन उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार असुन २४ जुन रोजी मतमोजणी होणार आहे.