सततच्या नापिकीला कंटाळून पळसखेड येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या – स्टेट बँकचे होते पीक कर्ज, गळफास घेऊन संपविली जीवन यात्रा

0
1142
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (Shahejad Khan) 
चांदूर रेल्वे तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून शेतात गळफास लावून आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. व बुधवारी सकाळी सदर घटना उघडकीस आली आहे. सुखदेव अंबादास आयणर (वय 37 वर्षे) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.
   गेली तीन वर्षांपासून सततचा पडणाऱ्या दुष्काळाने शेतकऱ्यांना शेती करणे फार कठीण होत चालले आहे. सुखदेव आयणर यांच्याकडे 5 एकर शेती आहे. मागील वर्षी सुखदेव आयणर या शेतकऱ्याने शेतातील पिकासाठी लावलेले पैसे सुद्धा निघाले नव्हते. तेव्हा त्यांनी पळसखेड येथील भारतीय स्टेट बँक यांच्याकडून पीक कर्ज घेऊन मागील वर्षी आपली शेती उभी केली. मात्र याही वर्षी त्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागले. शेतात पुरेसे उत्पादन झाले नाही, तेव्हा या वर्षी त्यांना पीक कर्ज भरणे शक्य नव्हते आणि जर या वर्षी पीक कर्ज भरले नाही तर नवीन पीक कर्ज बँक देणार नव्हते.  पीक कर्ज जर आपल्याला मिळाले नाही तर या वर्षीची शेती कशी उभी करायची ? हा प्रश्न सुखदेव आयणर यांच्यासमोर होता. या सर्व चिंतेने सुखदेव आयणर यांनी मंगळवारी रात्री गावा नजीक असलेल्या शेतात जाऊन गळफास घेतली व आपली जीवन यात्रा संपविली.
  मृतक शेतकरी सुखदेव आयणर यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, दोन लहान चिमुरड्या मुली आहे. शेती बरोबर सुखदेव हे रानावनात शेळी –  मेंढी चारण्याचा काम करत होते. त्यांचं संपूर्ण कुटूंबाची भिस्त त्यांच्यावर होती. सुखदेव यांनी आपली जीवन यात्रा संपविल्याने त्यांचे कुटूंब उघड्यावर आले आहे. बुधवारी सकाळी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनत्या पोलीसांनी पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. तायानंतर दुपारी पळसखेड येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.