चांदूर रेल्वेच्या आयटीआयमध्ये शाहू महाराज जयंती ‘सामाजिक न्यायदिन’ म्हणून साजरी

0
511
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (Shahejad Khan)

लोक कल्याणकारी राजा, बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १४५ वी जयंती बुधवारी स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. हा दिवस ‘सामाजिक न्यायदिन’ म्हणून साजरा केला गेला.

यावेळी आयटीआयचे प्राचार्य एस. एस. पाटबागे व गटनिदेशक डी. टी. शिंगणे यांनी सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून हार्रापण केले. यानंतर उपस्थित निदेशक व कर्मचाऱ्यांनीही फोटोचे पुजन करून अभिवादन केले. यावेळी बोलतांना गटनिदेशक डी. टी. शिंगणे यांनी म्हटले की, शाहू महाराजांनी जातिभेद अंतासाठी व अस्पृश्य उद्धारासाठी शिक्षणावरील उच्चजातीयांची मक्तेदारी तर मोडून काढली. शिक्षण केवळ अस्पृश्यांना खुले करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी आपल्या शासन दरबारात अस्पृशांना सन्मानाच्या जागा दिल्या. स्त्रीमुक्तीची सुरुवातही महाराजांनी आपल्या घरापासूनच केली. स्त्रियांना शिक्षण दिले. धर्माच्या नावाखाली मुले-मुली वाहण्याची अघोरी प्रथा बंद केली. असे अनेक गोरगरीब, आर्थिक दुर्बल, अनुसूचित जाती, जमातीतल्या नागरिकांसाठी सामाजिक योजना राबवून त्यांनी सर्वांना न्याय देण्याचे कार्य केल्याचे मत डी. टी. शिंगणे यांनी व्यक्त केले. यादरम्यान शिल्प निदेशक एच. यु. चांदुरकर, जी. एच. फेरण, मारोती मर्दाने, पी. बी. क्षार, एन. एन. वसुले, के. के. सिसोदे, पी. डी. पाचपोर, डी. दहापुते, कैलास चौधरी,  सौ. रंगारी, शहेजाद खान, सुरज चांदूरकर, प्रशांत टांगले, सुमीत वलीवकर, गजानन भडांगे, एस. टी. बेहेरे, भुषण खेडकर, शेलोकार, एस. एस. कांबळे, कर्मचारी सौ. पळसकर, शेळके, राठोड, कनोजे, सारवाण, पाटील यांसह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.