अखेर येवदा येथे लागले कामांचे माहीती फलक – प्रहारच्या इशाऱ्याने प्रशानाची सर्तकता

0
701
Google search engine
Google search engine

प्रत्येक कामांच्या ठिकाणी लागणार माहीती फलक

येवदा./ प्रतिनिधी 
दर्यापुर तालुक्यातील येवदा ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या आणि झालेल्या कामांचे माहीती फलक त्या ठिकाणी लावण्यात आले आहे.यानंतर प्रत्येक कामांचे अधिकारी आणि कंत्राटदारांच्या मोबाईलसह लावले जाणार आहे.प्रहार संघटनेने फलक लावण्याकरिता दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने ही अंमलबजावणी सुरू केली आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत झालेले विविध कामांचे लोकार्पण तसेच सुरू असलेल्या कामांचे माहिती दर्शक फलक लावण्यात यावे अशी मागणी प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर यांनी निवेदनाद्वारे सरपंच, प्रदिप देशमुख व ग्रामविकास अधिकारी,राजेंद्र चौखंडे यांच्याकडे केली होती. येवदा ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामे मंजुरी झाल्यावर ज्या संबंधित ठेकेदाराला काम मिळते त्या ठेकेदाराने काम सुरु करण्या अगोदर बांधकाम तसेच इतर कामे दर्शक तक्ता जन हिताच्या दृष्टीने लावणे आवश्यक आहे, शिवाय शासनाचे तसे आदेश देखील आहे,करिता ग्रामपंचायत अंतर्गत गाव परिसरात जी कामे चालू आहेत तसेच अलीकडेच लोकार्पण झालेल्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराला बांधकाम दर्शक तक्ते ग्रामपंचायत परिसरात दिसून येत नसल्यामुळे सदर परिसरातील कामे कोणत्या विभागाकडून होत आहे याची माहिती मिळत नोव्हती,त्यामुळे यातून भ्रष्टाचाराच्या घटना देखील होत असतात अशावेळी संबंधितांना जाब विचारण्याचा सर्व सामान्यांचा अधिकार आहे,त्यामुळे कामचे फलक विभाग,कंट्रातदार आणि अधिकारी यांच्या मोबाइल सह लावण्यात यावे अन्यथा संबंधित ठेकेदारांचे काम बंद करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हासंपर्क प्रमुख प्रदीप वडतकर यांनी दिला होता. या मागणीची दखल घेत चालु असलेल्या सर्वच कामांच्या ठिकाणी माहीती फलक झळकले आहे.