सावंगा (बु.) मधील हॅन्डपंपाची प्रताप अडसडांच्या पाठपुराव्यानंतर दुरुस्ती – संदीप सोळंके यांच्या प्रयत्नांना यश

0
660
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (Shahejad Khan) 
चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा (बुजरूग) पुनर्वसनमधील हँडपंप गेल्या अनेक वर्षांपासुन नादुरूस्त होते. अखेर प्रताप अडसड यांच्या पाठपुराव्यानंतर हँडपंपची दुरूस्ती झाली असुन संदीप सोळंके यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा (बुजरूग) हे गाव बेंबळा प्रकल्प यवतमाळमध्ये बाधित झाले असून या गावाचे पुनर्वसन सध्या चांदूर रेल्वे लगतच्या रेल्वे स्टेशन बाहेर करण्यात आले आहे. या प्रकल्पाने गावामध्ये एकूण पाच हँडपंप करून दिले होते. परंतु गेल्या चार वर्षापासून गावातील तीन हॅन्ड टपंप बंद अवस्थेमध्ये होते. वारंवार बेंबळा प्रकल्प, यवतमाळ यांना निवेदन देऊन काहीही करण्यास प्रशासन तयार नव्हते. कारण की काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे आम्ही हॅन्डपंप दुरुस्त करू शकत नाही असे अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले होते. शेवटी जिल्हा पुनर्वसन समिती सदस्य संदीप सोळंके यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप अडसड यांना माहिती घेऊन यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानंतर प्रताप अडसड यांनी ताबडतोब बेंबळा प्रकल्प,  यवतमाळ यांच्याशी संपर्क साधून हँडपंप दुरुस्त करण्याचे सांगितले होते. त्यानंतर अखेर गावातील हॅन्डपंप ची दुरुस्ती करण्यात आली असून गावकऱ्यांनी प्रताप अडसड व संदीप सोळंके यांचे आभार मानले.