बेटी बचाव बेटी पढाव अभियानाला सुरुवात

0
693
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे  / शहेजाद खान –
मुलींचे महत्व वाढावे मुलांप्रमाणे मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाला मिळावा यासाठी एकात्मिक बाल विकास शहरी नवीन प्रकल्प अमरावती तसेच चांदुर रेल्वे शहरी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय दिन म्हणून बेटी बचाव बेटी पढाव हा कार्यक्रम घेण्यात आला. विविध कार्यक्रमाने तो साजरा करण्यात आला.यावेळी  खडकपुरा आणि शेंद्रीपुरा केंद्राच्या वतीने पथनाट्य आरोग्य संदेश स्त्री भून हत्या या बेटी पढाव बेटी बचाव अभियाना अंतर्गत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी नवीन शहरी प्रकल्प अमरावतीमधील बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना इंगोले होत्या.  प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.सुनिता भगत, बौद्ध धर्मगुरू माता संगमित्रा, ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरु फादर विजय राऊत, इमाम काजी साहेब, हिंदू धर्माचे पुजारी उपस्थित होते. तसेच ग्रामीण बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती व्यवहारे पंचायत समितीमधील आरोग्य विभागाचे अडगोकर, नगर परिषदेचे उपाध्यक्ष देवानंद खुणे, नगरसेविका स्वाती मेटे, नगरसेविका कल्पना लांजेवार, नीलिमा शर्मा, दिपाली मिसाळ, नगरसेवक बच्चू वानरे उपस्थित होते.
एकात्मिक बाल विकास नवीन शहरी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक  न्याय दिनाचे औचित्य साधून दहावी व बारावी गुणवत्ता प्राप्त मुलींच्या सत्कार सुद्धा यावेळी घेण्यात आला अंगणवाडी सेविकांच्या मुली ज्या गुणवत्ता प्राप्त आहेत त्यांचासुद्धा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार घेण्यात आला तसेच बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाअंतर्गत काही होतकरू व  गरीब मुलींचे सुद्धा सत्कार घेण्यात आले. दहावी व बारावी मधील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये विजया बंडू आठवले, प्रांजली राजेश माताडे, उज्वला नरेश वानखडे, नेहा वानखडे, श्रावणी मनोज मोहोड, प्रज्ञा प्रमोद बोडखे, सानिका अरुण रामटेके, दिव्या डोंगरे यांचा यावेळी सत्कार घेण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक शहरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका सीमा बोडखे, अरुणा आठवले, जया मोटघरे, धनश्री श्रीराव,सुनंदा कांडेलकर, शारदा राऊत, शारदा तायडे ,गुलशन कुरेशी, शीला नागणे, शितल तिखे, मदतनीस नंदा नेवारे, अनुसया राऊत, वनिता चांगलाटे ,शारदा वानखडे,उमा सुखदेव, रजनी शेंद्रे, सुनिता गिरी, अर्चना ढेपे, मंदा घाठोड धामणगाव रेल्वे मधील शहरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका सुनिता कवाडे, हेमा बोरकर, श्रीमती बावनकुळे, रंजना जाधव, श्रीमती यादव श्रीमती शिंदे, श्रीमती किरणापुरे, श्रीमती शेलोकार, श्रीमती कडुकार, इत्यादी कार्यक्रमाच्या यशस्वी साठी मदत केली. कार्यक्रमाचे संचालन धनश्री श्रीराव यांनी केले तर आभार सुनिता कवाडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य सेविका निशा गायकवाड यांनी केले.