आज जाहीर होणार आयटीआयची पहिली प्रवेश फेरी निवड यादी – उद्या ११ जुलैपासुन करता येणार प्रवेश निश्चित

0
553
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)
     औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पहिली प्रवेश फेरी निवड यादी आज बुधवारी सायंकाळी ५ वाजता ऑनलाईनरित्या प्रकाशित होणार असुन उद्या ११ जुलैपासुन विद्यार्थ्यांना मिळालेल्या संबंधित संस्थेत प्रवेश निश्चित करता येणार आहे.
      राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट २०१९ या सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने करण्यात येत असून प्रवेश पद्धती माहिती पुस्तिका, नियमावली व प्रमाणित कार्यपद्धती सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ३ जून पासून उपलब्ध करुन देण्यात आली होती. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ३० जुनला संपल्यानंतर आयटीआयमध्ये अर्ज स्विकृतीची मुदत १ जुलैपर्यंत होती. पहिल्या फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्यक्रम सादर करण्याची प्रक्रिया याच दरम्यान करता आली. प्राथमिक गुणवत्ता यादी ४ जुलैला प्रकाशित झाली असुन अंतिम गुणवत्ता यादी ९ जुलै रोजी पहावयास विद्यार्थ्यांना पहावयास मिळाली. यानंतर आता पहिली प्रवेश फेरी निवड यादी आज १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ऑनलाईनमध्ये प्रकाशित होणार आहे. प्रवेश फेरी निवड यादीत विद्यार्थ्यांना मिळालेल्या संस्थेमध्ये उद्या ११ जुलै रोजी सकाळी ९ वाजतापासुन ते १५ जुलै ला सायंकाळी ५ वाजता पर्यंत मुळ कागदपत्रे सादर करून प्रवेश निश्चित करता येणार आहे.