भाजपातर्फे धामणगाव विधानसभेसाठी डॉ. नितीन धांडेंच्या नावाची कमालीची गुप्तता

0
1112
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (Shahejad Khan) 
विधानसभा निवडणुक जशी जवळ येईल तशीच निवडणुकीतील उमेदवारांमध्ये पक्षांतर्गत स्पर्धेतील रंगत वाढणार आहे. अनेक उमेदवार विविध पक्षाकडून निवडणुक लढण्यास इच्छुक आहे. परंतु शेवटी कोणाला तिकिट मिळेल हे आतापासुन सांगणे कठीन असले तरी भाजपातर्फे धामणगाव विधानसभा साठी विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या नावाची कमालीची गुप्तता बाळगत असल्याची चर्चा परिसरात आहे.
केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे भाजपाकडे अता उमेदवारांची गर्दी जास्त प्रमाणात पहावयास मिळत आहे. अनेक इच्छुक उमेदवार आपल्या कामांचा लेखाजोखा देऊन भाजपाकडे उमेदवारी मागत आहे तर काही इतर पक्षातुन भाजपामध्ये प्रवेश करीत तिकिटची मागणी करीत आहे. अशाच प्रकारची परिस्थिती धामणगाव रेल्वे – चांदूर रेल्वे मतदार संघात आहे. चांदूर रेल्वे मतदार संघात गेल्या अनेक टर्मपासुन आमदार अरूण अडसड हे भाजपातर्फे विधानसभेत उमेदवार आहेत. परंतु त्यांचा सलग तीन वेळा पराभव झाला आहे. २०१४ मध्ये तर अल्पमताने ते पराजीत आहे. यानंतर आता काही महिण्यापुर्वी माजी कृषीमंत्री पांडूरंग  फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेवर अरूण अडसड यांची वर्णी लागली. त्यामुळे ते सद्यास विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांच्या आमदार होण्याने आता भाजपाला विधानसभेमध्ये धामणगाव रेल्वे – चांदूर रेल्वे मतदार संघात नवीन चेहरा शोधावा लागत आहे. विधानसभेमध्ये भाजपातर्फे प्रताप अडसड, रामदास निस्ताने इच्छुक दिसत आहे. तर बसपाचे अभिजीत ढेपे भाजपाच्या वाटेवर दिसत असुन तिकिट मिळाल्यास ते हत्तीवरुन खाली उतरून कमळ हातात घेण्याच्या तयारीत आहे. परंतु याबाबत अजुन काहीही स्पष्ट चित्र पुढे आलेले नाही. भाजपातर्फे जास्त केवळ यांच्याच नावाची चर्चा असतांना एक गुप्त नाव सुध्दा पुढे आले आहे. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे हे धामणगाव विधानसभा क्षेत्रातुन निवडणुक लढण्यास इच्छुक असुन त्यांचे नाव पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचल्याची विश्वसनीय माहिती राजकीय सुत्रांकडून मिळाली आहे. नितीन धांडे यांना भाजपातर्फे उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असतांना मात्र त्यांचे नावाची गुप्तता पाळण्यात येत आहे. गुप्ततेचं कारण अस्पष्ट असुन भाजपातर्फे धामणगाव विधानसभा मतदार संघात उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असल्याचे समजते. तर प्रताप अडसड हे मात्र विधानसभेच्या दृष्टीकोनातुन जनतेच्या संपर्कात आहे. परंतु निवडणुक जवळ येईपर्यंत अजुन कुठले नवीन नाव भाजपातर्फे पुढे येणार का ?  व निश्चित कोणाला उमेदवारी मिळणार? हे सांगणे सद्यातरी कठीणच आहे.