सातेफळ येथे आरोग्य केंद्रात वृक्षारोपण कार्यक्रम

0
535
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – शहेजाद खान  
तालुक्यातील सातेफळ येथील आरोग्य केंद्रात बार्टीमार्फत बुधवारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी समता दूत सलीम खान पठाण यांनी समता वृक्षसंवर्धनाचे आयुष्यातील महत्त्व यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपसरपंच संजय खंगार, विद्यामंदिर विद्यालयाचे मुख्याध्यापक मानवटकर, ग्राम आरोग्य समितीचे सदस्य श्री बंडू म्हसतकर, अंगणवाडी सेविका विजया चौधरी, ज्योती तिजारे, आरोग्य कर्मचारी, गावातील नागरिक , युवक, सहभागी झाले होते.