कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी निशिकांत रामटेके यांचा पत्रकार संघाचे वतीने सत्कार

0
441
Google search engine
Google search engine
सिंदेवाही- सिंदेवाही पोलीस स्टेशनला कांही महिन्यापूर्वी चन्द्रपुर वरून बदलून आल्यावर सिंदेवाही पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेल्या ठाणेदार निशीकांत रामटेके यांनी आपल्या काम करण्याची वेगळी शैली व तत्परता दाखविली असून त्यांनी सिंदेवाही पोलीस स्टेशनचे हद्दीतील दारू तस्करांनी व विक्रेत्यांनी धसका घेतला असुन बर्‍याच प्रमाणात दारू तस्करी व विक्री चे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. दिनांक १४/७/२०१९ रोजी सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी (नलेश्वर) येथील विलास ढोक यांची वैश्णवी नावाची १० वर्ष वयाची मुलगी ही घरासमोरील अंगणात खेळत असतांना अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीचे आई वडील यांनी केल्यानंतर परिस्थितीतचे गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब शोध मोहीम राबविण्यात येऊन अवघ्या दोन तासातच पोलिसांनी मुलीला शोधुन काढून मुलीला आईवडलांचे ताब्यात दिल्याबद्दल पो. नि. निशिकांत रामटेके आणि सहकारी यांचे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्याबद्दल सिन्देवाही नगर पत्रकार संघाचे वतीने दिनांक – १७/७/२०१९ ला सिंदेवाही पोलीस स्टेशनला अप्पर पोलीस अधीक्षक मा. प्रशांत खैरे साहेब यांचे उपस्थितीत आणि त्यांचे साक्षीने पो. नि. निशिकांत रामटेके यांचा पत्रकार संघाचे वतीने सचिव श्री. भगवंत पोपटे, यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मा. खैरे साहेब यांचे हस्ते पत्रकार संघातर्फे ट्राफी व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाला पत्रकार संघाचे अध्यक्ष – वहाब्अली सैय्यद हे प्रामुख्याने उपस्थित होते.