ब्रम्हपुरी पोलीस उपविभागा तर्फे निरोप समारंभ

0
591
Google search engine
Google search engine

ब्रम्हपुरी:-ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेशी यांची पालघर येते बदली झाल्या निमित्ताने ब्रम्हपुरी पोलीस विभागातर्फे त्याचा आज दि 20 ला निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.
शहरातील दुपारे लॉन येथे पार पडलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमाला माजी आमदार अतुल देशकर,मुख्याधिकारी मंगेश खेवले, ब्रम्हपुरी पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, यांचे सह तळोधी, नागभीड, सिंदेवाही येथिल पोलीस निरीक्षक मंचावर उपस्थित होते। या निरोप समारंभ कार्यक्रमा ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांचा सपत्नीक शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय रामटेके,सचिव दीपक पत्रे, प्रा विजय मुडे ,प्रशांत डांगे,प्रा.नुरुल अन्सारी सर, प्रा. शाम करंबे ,दत्तात्रय दलाल, गोवर्धन दोणाडकर, दिलीप शिनखेडे, महेश पिलारे ,प्रा गणवीर सर,दिवाकर मंडपे ,प्रवीण मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते।
निरोप समारंभ कार्यक्रमात माजी आमदार अतुल देशकर, ब्रम्हपुरी पोलीस निरीक्षक मकेश्वर,निशिकांत रामटेके ,मंगेश खेवले मुख्याधिकारी ब्रम्हपुरी,रोशन शिरसाट ,प्रा विजय मुळे पत्रकार,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस विभाग ब्रम्हपुरी अंतर्गत येणारे ब्रम्हपुरी,नागभीड, सिंदेवाही,तळोधी येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी,ब्रम्हपुरी शहरातील अनेक मान्यवर , पत्रकार ,नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.