सेदानी इंग्लिश स्कुलमध्ये लोकमान्य टीळकांना अभिवादन

0
496
Google search engine
Google search engine

आकोट/ता.प्रतीनिधी- 

स्थानिक पोपटखेड मार्गावरील लेट दिवालीबेन सेदानी इंग्लिश स्कुल मध्ये दि.२३ला लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सौ स्मिता सेदानी होत्या प्राचार्य विजय भागवतकर,मुख्याध्यापक प्रशांत मंगळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमीकच्या मुख्याध्यापिका सौ स्नेहल अभ्यंकर यांच्या हस्ते टीळकांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी मंचावर संतोष विणके ,संदेश चोंडेकर यांची उपस्थीती होती.वर्ग १ ते ४ च्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जिवन कार्यावर आपले विचार व्यक्त केले.शिक्षकांच्या वतीने पुजा लावणे यांनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिव्या सेदानी यांनी केले.