बाळापूर पोलिसांनी दिले १० गोवंशांना जीवनदान

0
626
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी:अकोला:-
वाडेगाव येथून शेगावला कत्तलीला घेऊन जाणाऱ्या दहा गोवंशाला बाळापूर पोलिसांनी जीवदान दिले. गोवंशाची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. सुमारे चार लाख रुपये किंमतीचे गोवंश ताब्यात घेऊन पोलिसांनी गोरक्षणच्या ताब्यात दिले .ही कारवाई सोमवारी पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी केली.
पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी पोलिसांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी टाटा एस वाहन क्रमांक एम एच १९ एस ४६७३ व टाटा एस एम एस २१ डी ९९९६ या दोन पिकअप वाहनामधून क्रूरतेने गोवंशाची वाहतूक करीत असतांना चार आरोपीना ताब्यात घेतले. त्यात जमीर शाह रफिक शाह वय ३६, रा.ईद गाह प्लॉट शेगाव, शेख हनिफ शेख ख्वाजा वय २८ रा. पैठ मोहल्ला ,शेगाव, पुरुषोत्तम रमेश टिकार वय ३२ रा. मोदी नगर शेगाव, शेख करीम शेख चांद वय २३ रा. पैठ मोहल्ला शेगाव या आरोपीचा समावेश आहे. या वाहनांमधून १० गोवंश ताब्यात घेऊन म्हैसपूर येथील गोरक्षण संस्थेमध्ये रवाना करण्यात आले. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, हेड कॉन्स्टेबल सुभाष राठोड, विजय जामणिक यांनी केली.