शौचालयाची अनुदान रक्कम लाभार्थ्यांना त्वरित द्या :- तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर मानकर

0
493
Google search engine
Google search engine

आकोटः प्रतिनीधी-
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव हागवणत दारी मुक्त व्हावे या उद्देशाने शौचालय बांधण्याकरिता देण्यात येणाऱ्या शौचालयाची अनुदान रक्कम पिंप्री गावातील लाभार्थ्यांना त्वरित मिळावी या मागणीसाठी सोमवारला गटविकास अधिकारी पं.स.अकोट यांना निवेदन देण्यात आले.

हागणदारीमुक्त गाव व्हावे म्हणुन शासन निधी देत असते पण गेल्या एक महिन्यांपासून गटग्रामपंचायत पिंप्री खुर्द -पिंप्री जैनपुर मधील पिंप्री जैनपुर येथील लाभार्थ्यांना शौचालय बांधकाम होवुन शासन नियमानुसार प्रक्रिया पुर्ण झाली पण अजुन लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही.
लाभार्थ्यांनी स्वखर्चाने शौचालय बांधकाम केले व होते नव्हते पैसे काही शेतकामाचे पैसे गमावून बसले व आता अनुदानाची प्रतीक्षा करत आहेत तरी अनुदानाची रक्कम त्वरित जमा करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पिंप्री खुर्द-पिंप्री जैनपुर चे तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर मानकर यांनी दिला आहे तसेच यावेळी सचिन मानकर,श्रीहरी वसु,विजय मानकर,नामदेव बानेरकर,भास्कर मानकर,रामेश्र्वर मानकर व गावकरी उपस्थित होते.