सहा ऑगस्ट ला नगरपंचायत सिंदेवाही ची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची चौथ्यांदा निवडणूक

0
721
Google search engine
Google search engine

तालुका प्रतिनिधि –सिंदेवाही नगरपंचायत चे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची अडीच वर्षाची मुदत संपल्यानंतर याआधी तीनदा निवडणूक घेन्याचे ठरले असतांना पुढील निवडणूक प्रक्रिया ठरली होती परंतु सत्ताधारी भाजप पक्षाचे चार नगरसेवक कॉंग्रेस च्या गोटात जाऊन मिळाल्याने सत्ताधारी पक्षातर्फे निवडणूकीवर तिनदा स्थगिती मिळविण्याच्या प्रक्रियेला यश मिळाल्याने नगरपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे निवडणूकीत विरोधी पक्षाच्या आशा आकांक्षावर विरजन पडले.

              नव्याने निवडणूक घेण्यासाठी मा. जिल्हाधिकारी, चंद्रपुर यांचे कार्यालयाचे आदेश क्र. कार्या. – १०/ नविशा/निवड. लि. टं./ टे. ३/२०१९/२९२ ,दिनांक – २३ जुलै. २०१९ या पत्राचे व विषयाचे अनुषंगाने सिंदेवाही नगरपंचायत च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक दिनांक – ०६/०८/२०१९ ला नगरपंचायत कार्यालय, सिंदेवाही येथे होत असल्याबद्दल मुख्याधिकारी न. पं. सिंदेवाही यांनी कार्यालयीन प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले असल्याचे अधिकृत वृत्त आहे. सदर निवडणूकीचे संमंधाने काही अनूचित प्रकार घडून शांतता व सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी व परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक,मा. निशिकांत रामटेके, पोलीस स्टेशन सिंदेवाहीकडून  सुरक्षेबाबत परिस्थिति चा मागोवा घेत असल्याचे त्यांनी सांगितले.