आपुल्याच घरी आपलेच स्वागत

0
719
Google search engine
Google search engine

पाऊले चालती परतीची वाट
आपुल्याच घरी आपलेच स्वागत

शेगांव:- 55 दिवस अगोदर विदर्भ पंढरी म्हणून ज्यांची जगभर ख्याती आहे ,असे शेगावीचे राजे संत गजानन महाराज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठूरायांच्या भेटीसाठी पंढरपुरला गेले होते. त्यांची पालखी आज स्वगृही येत आहे.
सकाळी 11 वाजता महाराजांची पालखी गजानन महाराज इंजिनियरिंग कॉलेज येथे आली तेथे गेटवर महाराजांच्या पालखीचे भव्य स्वागत झाले, त्यानंतर महाराजांची पालखी गजानन महाराज संस्थान द्वारे स्थापित केलेली वाटिका येथे जाऊन काही वेळ विश्रांती होणार ,
त्यानंतर ०२ वाजता महाराजांच्या पालखीचा पुढचा प्रवास सुरु होईल संध्याकाळी ०६ वाजता महाराजांची पालखी मंदिरांमधे प्रवेश करेल त्यानंतर तेथे आरती होऊन 55 दिवसांपासून सुरू असलेला जवळजवळ ११५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण होईल आणि या भव्यदिव्य सोहळ्याची सांगता होईल
यावेळी लाखो भाविक खामगाव ते शेगाव पालखी सोबत पाई येतात संपूर्ण शहराला आज पंढरपुर प्रमाणे भाविकांची मंदीआळी आलेली असते शहरात आनंद दिसत असतो जागो जागी रांगोळी ,फराळ ,चाहा नास्ता ,दुध ,वाटप करुन गावातिल भाविक हा आनंद साजरा करतात.