अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृतु

0
586
Google search engine
Google search engine

तालुका प्रतिनिधि- इंदिरा नगर येथील रहवाशी महिलेला अज्ञात वाहनाने धड़क दिल्याने मृतु झाल्याची घटना उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की इंदिरा नगर तेथील महिला कल्पना अशोक निकुरे वय-३८ वर्ष ही महिला काल घरून शेतीच्या कामाकरिता किन्ही रोडने जात असतांना मागुन येना-या अज्ञात वाहनाने धड़क दिली. त्या धड़कने महिला रोडाच्या बाजुला पडली त्यानंतर अज्ञात वाहन चालकाने वाहन न थांबवता तिथून पळुन गेला. त्याअवस्थेत महिलेला कोणतेही प्रकारचे सहकार्य न मिळाल्याने रात्रभर घटनास्थळीच पाडून राहून गतप्राण झाली.

दुसा-या दिवशी शोधा-शोध केली असता महिलेचे प्रेत सिंदेवाही वरून दोन किलीमीटर अंतरावर रोडच्या बाजुला झुडपात पडून असल्याचे आढ़ळुन आले त्यामुळे अज्ञात वाहनचालकाने महिलेचे प्रेत रोडवरुन झुडपात फेकल्याचा संशय घटनास्थळावरून दिसुन येते.

वरील घटनीची माहिती पोलिस स्टेशन सिंदेवाहीला मिळताच घटना पंचनामा करुन अज्ञात वाहनचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला. सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी नेरकर हे करीत आहे.