मोर्शी येथील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सायकल चोराला केले पोलिसांच्या स्वाधीन 

0
921
Google search engine
Google search engine

रुपेश वाळके/ मोर्शी :-

मोर्शी येथील स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेत शाळा संपल्यानंतर एनसीसी विद्यार्थ्यांची परेड व विविध खेळांचा सराव सुरू असतांना आणि सर्व विद्यार्थी त्यांच्या सरावात दंग असल्याचे पाहून वल्लभ नगर अमरावती येथील मयूर राजेश चाळीसगावकर या भामट्याने संधीचा फायदा घेत वर्ग ९ मधिल श्रीकेश शिवहरी बेंडे या विद्यार्थ्यांची सायकल शाळेच्या परिसरातून चोरून नेण्याचा प्रयन्त केला ही बाब वैभव आखरे या विद्यार्थ्यांच्या लक्ष्यात येताच त्याने आरडाओरड केली त्यामुळे इतर विद्यार्थी सतर्क झालीत व त्यांनी चोराचा पाठलाग केला.आपला पाठलाग होतांना पाहून चोराने सायकल रस्त्याच्या कडेला टाकून धूम ठोकली.विद्यार्थ्यांनी मात्र त्या चोराचा पाठलाग चालूच ठेवला व त्याला सर्व मिळून शाळेत धरून आणले,त्याला धरण्याचा प्रयन्त करीत असतांना चोराने या विद्यार्थ्यांना गोटे मारायला सुद्धा सुरवात केली परंतु त्याची पर्वा न करता धाडसाचा परिचय देत त्या चोराला शाळेतील शिक्षकांच्या मदतीने पोलिसांच्या स्वाधीन केले.पोलिसांनी शाळेचे पर्यवेक्षक सुरेश गुर्जर यांच्या तक्रारी वरून या युवाकावर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली.या पूर्वी देखील शाळेतून तीन सायकल चोरी गेल्या असून त्याचा संशय सुद्धा याच युवाकावर घेण्यात येत आहे.
या सायकल चोराला पकळण्यात संकेत कुकडे,वलय आंडे, यश गुप्ता,वैभव आखरे,पुष्कर लेकुरवाडे या एनसीसी कॅडेट्सनी मोलाची भूमिका बजावली.त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.