सिंदेवाही नर्सिंग कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिन कार्यक्रम

0
700
Google search engine
Google search engine

सिंदेवाही ता. प्र.- सिंदेवाही मध्ये युवा दिना निमित्त आय. सी. टी .सी .विभाग ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही व संकल्प ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था लिंक वर्कर प्रकल्प चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने संत गजानन महाराज नर्सिंग स्कूल येथे आंतरराष्ट्रीय युवा दिन कार्यक्रम तसेच तपासणी शिबिर घेण्यात आले.
या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून वनिता न्यालेवार समुपदेशिका ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही यांनी एचआयव्ही एड्स या आजाराबाबत जनजागृती व्हावी त्यांचे गैरसमज त्याची कारणे व लक्षणे कोणती याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच युवक-युवती यांचे देशासाठी असलेले योगदान अतिशय महत्वाचे आहे .सृजनशील अश्या युवाशक्तीच्या माध्यमातून जगभरात शांततेची स्थापना व्हावी . हा या कार्यक्रमा मागचा उद्देश आहे . तुम्हाला जर एचआयव्ही व्ही एड्स बाबतीत प्रश्न असतील तर 1097 या टोल फ्री नंबर वर काल करू शकता हा मेसेज आपल्या पुरताच मर्यादित न ठेवता आपल्या परीवारा पर्यंत पोहोचायला हवा. तेव्हाच जनजागृती होणार तसेच मोरेश्वर ढोरे लिंक वर्कर यांनी नो युवर एचआयव्ही स्टेटस या घोषवाक्य बद्दल माहिती देऊन युवक हा समाजात बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा घटक असतो .त्यामुळे जागतिक युवा दिनाच्या माध्यमातून चर्चा व्हावी म्हणून 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केल्या जातो या कार्यक्रमाला उपस्थित डाँ.एम.एम.पुसणाके सर ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही नर्सिंग कॉलेजचे प्रशांत शेंडे सर पूजा माकोडे शुभांगी मेश्राम अवधूत गायकवाड यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे आभार पूजा माकोडे यांनी केले व व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.