तीन तलाक कायद्या नुसार बाळापूर पोलीस स्टेशन मध्ये पहीला गुन्हा दाखल

0
689
Google search engine
Google search engine

अकोलाः प्रतिनिधी-
मुस्लिम महिला(विवाह वरील हक्काचे सौरक्षण कायदा)2019 चे कलम 4 नुसार पहिला गुन्हा बाळापूर पोलिस स्टेशन मध्ये दाखल झाला आहे.

पोलिस सुत्रानुसार फिर्यादी ही बाळापूर शहरातील राहणारी असून तिचे लग्न 2013 मध्ये मंगरुळपिर येथील मोहंमद जाफर मोहंमद तस्लिम ह्याचे सोबत झाले होते, त्यांना तीन अपत्ये सुद्धा झाली, परंतु तिचा पती, सासू ,सासरे, नणंद , किरकोळ कारणं वरून तसेच दिसायला चांगली नाही म्हणून तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ करीत होते व सतत तिला टोचून बोलत होते व पती मोहंमद जाफर हा तू मला नको, मी दुसरे लग्न करतो, तू निघून जा असे नेहमी बोलत होता व शिवीगाळ करीत होता, ह्या त्रासाला कंटाळून ती मुला सह माहेरी बाळापूर येथे राहायला आली, दिनांक 21।8।19 रोजी दोन्ही पार्ट्या आपसी समझोता करण्या साठी बाळापूर ला आल्या होत्या परंतु त्यांचे मध्ये आपसी समझोता न होता भांडण झाले व पतीने भर बैठकी मध्ये ह्यातील फिर्यादी हिला, तुझे तलाक दिया असे तीन वेळेस बोलून तिला गैरकायदेशीर तलाक दिला, फिर्यादी च्या तक्रारी वरून बाळापूरचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी फिर्यादीच्या पती सह, सासरा मोहम्मद तस्लिम, सासू अलियु निसा, नणंद शाहीन परवीन तसेच नातेवाईक अब्दुल गणी अब्दुल अजीज ह्यांचे विरुद्ध कलम 498(अ), 504, 34, IPC मुस्लिम महिला (विवाह वरील हक्काचे सौरक्षण कायदा )2019 प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल केला, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नौशाद करीत आहेत