अमरावती जिल्हा युवक काँग्रेस ची मुख्य वन संरक्षक कर्यालय येथे धड़क – ई वाघिणीला इतरत्र सोडण्याबाबत निवेदन

0
495
Google search engine
Google search engine

मेळघाट येथील जवळ पास ३० गावांमध्ये नरभक्षक ई वाघिणीने घातलेल्या दहशती मुळे ‘ या ई वाघिणीचा बंदोबस्त करणेबाबत आज विभागीय मुख्य वनसंरक्षक मा.श्रीं.रेड्डी यांना निवेदन देण्यात आले .
दादरा गावातील शोभराम कालुसिंग या शेतकऱ्यावर हल्ला करून E1 वाघिणीने त्यांना ठार केले या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन युवक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे यांचे नेतृत्व मधे वनाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली व या नरभक्षक वाघिणीला तात्काळ जेरबंद करून इतरत्र स्थलांतरित करण्याचे मागणी केली,अमरावती येथून बचाव पथक व वनविभागाचे भरारी पथक मेळघाट कडे रवाना झाले असून E1 वाघिणीला पकडून तात्काळ नागपूर येथील प्राणी संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना तात्काळ शासकीय मदत व नुकसान भरपाई देण्याची मागणी ये वेळी करण्यात आली आपण मेळघाट वासीयांच्या पाठीशी असून नागरिकांच्या भावनांची आपण नेहमीच दखल घेत आहेत. निवेदन देते वेळी उपस्थिति पंकज मोरे जिल्हा अध्यक्ष प्रदेश सचिव समीर जवंजाळ.प्रदेश सचिव राहुल येवले. जिल्हा उपाध्यक्ष सागर कलाने.जिल्हा उपाध्यक्ष रवी रायबोले.बडनेरा विधान सभा अध्यक्ष योगेश बुंदेले.आशिष यादव ..गुड्डू हमीद.किरण महल्ले राजु पिसे.अनिकेत जावरकर.चेतन गायकवाड.उपस्थित होते