कृषी मंत्री यांच्या जिल्ह्यात वाळलेल्या संत्रा झाडाचे सर्वेक्षण शेतात न जातात, शेतकरी फोन करून विचारली जाते माहिती

242

कृषी मंत्री यांच्या जिल्ह्यात वाळलेल्या संत्रा झाडाचे सर्वेक्षण शेतात न जातात,
शेतकरी फोन करून विचारली जाते माहिती.

 चांदुर बाजार

उन्हाची दाहकता या वर्षी अधिक होती त्यामुळे पाण्या अभावी मोठ्या मेहनतीने शेतकरी यांनी तयार केल्या संत्रा फळबाग या वाळल्या. याच्या सर्वेक्षण होहून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी ही शेतकरी याची आशा होती.मात्र सर्वेक्षण लांबले.यामुळे शेतकरी यांच्या वर पुन्हा आर्थिल संकट उभे राहण्याच चित्र दिसू लागले.यातच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कृषिमंत्री यांच्या आदेशानुसार वरून वाळलेल्या संत्रा झाडाचे सर्वेक्षण सुरू झाले.या त शेतात जाऊन सर्वेक्षण करणे अनिवार्य असताना  वणी बेलखेडा परिसरात तलाठी आणि कृषि सेवक हे रोडवरून शेतकरी यांच्या वाळलेल्या संत्रा झाडाचे सर्वेक्षण करीत आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील वणी शेत भाग हा पूर्णा मध्यम प्रकल्प जवळ असला तरी या भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई होती.याच मुळे शेतकरी यांच्या संत्रा फळबाग वाळल्या.याचे सर्वेक्षण सुरू आहे.मात्र वणी या भागात एक शेतकरी याना रोडवर थांबवून त्याच्या कडून त्याच्या जवळील शेतकरी यान फोनवरून  माहिती घेऊन संत्रा झाडाचे सर्वेक्षण सुरू आहे.मात्र या शेतकरी यांच्या शेतात जायला कृषिसेवक आणि तलाठी हे का घाबरत  आहे अशा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहे.सर्वेक्षण करायचे म्हणून करायचे असे तलाठी आणि कृषी सेवक यांच्या या प्रकारच्या सर्वेक्षण वरून दिसून येत आहे.

प्रतिक्रिया:-
पाणी टंचाई मुळे या भागातील संत्रा फळबाग या मोठ्या प्रमाणात वाळल्या आहे. याचे सर्वेक्षण सुरू असल्याने तलाठी आणि कृषिसेवक यांनी शेतकरी यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष संत्रा झाड पाहून नुकसान लिहिणे आवश्यक आहे.
मंगेश देशमुख वणी शेतकरी