दमदार पाऊस व विजेच्या तांडवाने सिंदेवाही सह जाटलापूर वासियांना हादरून सोडले.

0
548
Google search engine
Google search engine

तालुका प्रतिनिधि – सिंदेवाही.
खालिद पठान
**************
दिनांक – ३० आँगस्ट चे रात्रीला झालेल्या दमदार व मुसळधार पावसाने अक्षरशः सिंदेवाही ला झोडपून काढले होते. रात्रभरच्या धो, धो पडणाऱ्या दमदार पावसामुळे जाटलापूर येथील फुटके तलाव, लागुनच असलेले गांव तलाव काठोकाठ भरून, तलावातुन अधिकचे पानी वाहून जान्यासाठी असलेले सांड ( वेस्टवेअर) पान्याने ओसंडून वाहात होते. अचानक झालेल्या अतीवृष्टीमूळे तलावाच्या काठावर वसलेल्या घरांचे भोवती पावसाचे पाणी पोचले होते. आणि वरून पाऊस येने सुरूच होते. अधेमधे विजेचा कडकडाट पण सुरू होता. पण पहाटे चार वाजता चे दरम्यान विजेने रौद्ररूप धारण करून असे तांडवनृत्य केले होते की, सिंदेवाही व जाटलापूर येथील जनतेने पहिल्यांदाच तसा विजेच्या कडकडाचा आवाज ऐकला असेल. विजेच्या जोरदार आवाजाने व लख्ख प्रकाशाने कांही लोकांचे टि. व्ही. संच सुद्धा खराब झाल्याचे कळते. दिवस उजाडल्यावर अनेक लोकांचे तोंडून ऐकायला मिळत होते की, गेल्या ४०/५० वर्षांत असा एकसारखा पाऊस व येवढ्या जोरात विजेचा लखलखाट व कडकडाट बघायला मिळाला नाही. दिवस उजाडला तेव्हा जिकडे, तिकडे पाणीचपाणी दिसायला लागले. सिंदेवाहीत तर प्रमुख मार्गावरून ये, जा करीत असलेले प्रवासी यांना पायदळ चालन्यास व दुचाकीस्वारांना दुचाकी वाहने चालवायला अडचन होत होती. तलाव, बोड्या, नाले, नद्या ओसंडून वाहत होत्या. कांही नद्यांवरील रस्ते पुलावरून पाणी वाहत असल्याने कितीतरी तास बंद ठेवण्यात आले होते. अतिवृष्टीची झळ सिंदेवाही चे पोलीस प्रशासनाला सुद्धा पोचली असल्याचे बघायला मिळाले. कारण पुलावरून पाणी वाहत असतांना कुनी जान्यासाठी प्रयत्न केला असता, तो पुराचे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात वाहून जाऊ नये याची खबरदारी घेत असता पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके आणी सहकारी अधिकारी, कर्मचारी यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सिंदेवाही ला येणारे सर्व मार्ग अति पावसामुळे बंद झाले होते. निसर्गाच्या मनात आले तर काहिही होऊ शकते याची प्रचिती सिंदेवाही तालुक्यातील जनतेला आली हे नक्की आहे. जवळपास सतत २४ तास पडलेल्या पावसामुळे तालुक्यातिल अनेक गावांचा संपर्क सिंदेवाहीशी तुटलेला होता. बससेवा पुर्णपणे विस्कळीत झाली होती. तसेच अनेक गावात विजसेवा खंडित झाल्याने रात्रभर अंधारासह मच्छर व डासांचा सामना करावा लागत होता. सततच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक कच्चे व मातीचे घरे पडल्याने त्यांचा संसार उघडय़ावर येऊन लाखोंचे नुकसान झाले असल्याबाबत अनेकांनी फोनद्वारे कळविले आहे. सोबतच नुकतीच धानाची रोवनी केलेल्या बांध्यांमध्ये आजपर्यंत तरी पाणी भरून असल्याने शेतकऱ्यांचे धानपिकाचे सुद्धा आतोनात नुकसान झाले आहे. अशावेळी तालुका प्रशासनाने लक्ष देऊन शक्यतोवर तातडीने मोक्का पंचनामा करून, झालेली नुकसान भरपाई ची कार्यवाही लवकरात लवकर करून सहकार्य करावे ही अपेक्षा.