देऊरवाडा येथील अवैध दारू बंद करण्यासाठी महिलांनी दिले निवेदन देऊरवाडा येथे एकूण 5 अवैध दारू विकर्ते,पोलिसांची कार्यवाही नाही, अमरावती//चांदुर बाजार

0
813
Google search engine
Google search engine

देऊरवाडा येथील अवैध दारू बंद करण्यासाठी महिलांनी दिले निवेदन
देऊरवाडा येथे एकूण 5 अवैध दारू विकर्ते,पोलिसांची कार्यवाही नाही,

अमरावती//चांदुर बाजार

अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या देऊरवाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारूचे धंदे सुरू यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी गावातील महिलांनी शिरजगाव कसबा पोलिसांना निवेदन देण्यात आले.

अवैध दारू विक्री करणारे यांनी मोठ्या प्रमाणावर आपला व्यवसाय थाटला असून यावर ठाणेदार मुकुंद कवाडे याच्या नंतर अंकुश लावले नवीन ठाणेदार याना जमले नाही.त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर तरुण हे दारूच्या व्यसनाला बळी पडत आहे.या दारू मुळे गावातील नागरिकांनी प्राण गमावले आहे.या प्रसंगी अनेक वेळा निवेदन आणि तोंडी सांगून देखील पोलिसांनी कार्यवाही केली नाही.तसेच या मुळे गावातील अवैध दारू विक्री करणारे हे “पोलीस आमचे काहीच करू शकत नाही” असे सांगून आपला व्यवसाय वाढवीत आहे.तसेच या ठिकाणी बिट जमादार याचे अवैध दारू विक्री करणाऱ्या सोबत आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा देऊरवाडा गावात वाढत असलेले अवैध दारू विक्री व्यवसाय आणि त्यांच्या वर न होणाऱ्या कार्यवाही वरून दिसून येते.या वर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी महिलांनि केली आहे.

जवळपास निवेदन देताना देऊरवाडा येथील शेकडो महिला या पोलीस स्टेशन वर धडकला होत्या.यावेळी निवेदन देताना नीलिमा निमकर,प्रिया अमझरे, ज्योती पोटे,सुनीता रेखाते,सोनू भलावी,मंगेश दाडे, स्वप्नील घायर,परीक्षित सुने,सचिन केदार हे उपस्थित होते.