अचलपूर विधानसभा मतदार संघात करणार 2,74,590 मतदार मतदान सहा.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती

0
790
Google search engine
Google search engine

अचलपूर :-

नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अचलपूर विधानसभा मतदार संघातील २ लाख ७४ हजार ५९० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात पुरूष मतदारांची संख्या १ लाख ४२ हजार १८९ तर महिलांची संख्या १ लाख ३२ हजार ३९७ तसेच इतर मतदारांची संख्या ४ आहे, दिव्यान मतदार मध्ये ६१२, सैनिक मतदार 455 , उमेदवारांनी संपूर्ण खर्च हा स्वतःचा खात्यातूनच कराव्या लागणार आहे , उमेदवार यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची महिती लोकल पेपर मध्ये माहिती देणे बंधनकारक आहे, अशी माहिती अचलपूर चे उपविभागीय अधिकारी तथा अचलपूर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार शं अपार यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

२७ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार असून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. ४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची तर ५ रोजी छाननी अणि ७ रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २१ रोजी मतदान आणि २४ रोजी मतमोजणी होणार आहे.

आयोगाच्या सूचनेनुसार आचारसंहिता सुरू होताच जेथे राजकीय पक्षांचे किंवा लोकप्रतिनिधींच्या नावाचे फलक आहेत, ते हटविण्याचे आदेश सर्व कार्यालय प्रमुखांना देण्यात आले आहेत. यावेळीही सी व्हिजिलद्वारे उमेदवारांवर लक्ष ठेवण्यात येणार असून मतदारांना तक्रार नोंदविता येणार आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांना व उमेदवार यांना निवडणुकीबाबत एकाच खिडकीवर सर्व सभा, रॅली यांचा परवाना मिळणार आहे अशी माहिती .निवडणूक अधिकारी यांनी दिली