राष्ट्रवादीला मोठा धक्का !

103

बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांवर ईडीने केला गुन्हा दाखल!

पुणे – आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रावादी यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला होता.राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.संचालक मंडळाने नियमांचं उल्लंघन केल्यामुळे बँकेला फटका बसला होता.या राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी याअगोदरच अजित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी हायकोर्टाने बजावले होतं.याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे,राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

ईडीने शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात मनी लॉडरिंग आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या ईडीने गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये शरद पवार, अजित पवार यांच्यासह 70 माजी संचालकांचा समावेश आहे.या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवारांसोबतच आता शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।