मांजरखेड (कसबा) येथील श्री क्षेत्र पाताळेश्वर संस्थानच्या अध्यक्षपदी नरेंद्र देशमुख

0
1118
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे –
चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र पाताळेश्वर व श्रीरामचंद्र देवस्थानच्या अध्यक्षपदी नरेंद्र निळकंठराव देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी देवस्थानचे सचिव, कोषाध्यक्ष व संचालक मंडळ उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. या नियुक्तीमुळे त्यांचे आर.एन. देशमुख, शैलेश देशमुख, सचिव रंगराव देशमुख, रंगराव लव्हाळे, गजानन मानकर, संजय सव्वालाखे, गणेश ठाकरे, ज्ञानेश्वर होले व गावातील इतर मान्यवरांनी कौतुक केले आहे.